Friday, March 29, 2024
Homeदेशमुंबईचा ट्रॅफिकमध्ये जगात चौथा क्रमांक!

मुंबईचा ट्रॅफिकमध्ये जगात चौथा क्रमांक!

Mumbai Traffic, Traffic, नवी दिल्ली : रस्त्यावर सर्वात जास्त वाहनांची गर्दी असलेल्या शहरात भारताची राजधानी दिल्ली पाचव्या स्थानावर आहे. तर मुंबई चौथ्या क्रमांकावर आहे. जगात सर्वात जास्त ट्रॅफिक असणारे शहर म्हणून बेंगळुरू हे शहर ‘अव्वल’ ठरले आहे. बेंगळुरूमध्ये सर्वात जास्त ट्रॅफिक आहे. अशी माहिती एका सर्व्हेतून  समोर आली आहे.

जगात सर्वात जास्त ट्रॅफिक असलेल्या टॉप १० शहरात  भारतातील ४ शहरांचा समावेश आहे. शहर मोबिलिटी क्षेत्रात काम करणाऱ्या एका खासगी संस्थेने आणि लोकेशन टेक्नॉलॉजी एक्सपर्ट टॉमटॉम च्या एका सर्व्हेत ही माहिती देण्यात आली आहे. या सर्व्हेत भारतातील टॉप शहरांचा समावेश करण्यात आला आहे.

दिल्लीकरांना पिक अवर्स दरम्यान गाडी चालवताना अन्य शहरांच्या तुलनेत वर्षाला १९० तासांहून अधिक वेळ खर्च करावा लागतो. तो एकूण ७ दिवस आणि २२ तास इतका आहे. गेल्यावर्षी दिल्लीत सर्वात जास्त ट्रॅफिक २३ ऑक्टोबर रोजी होते. जे ८१ टक्क्यांपर्यंत पोहोचले होते. त्या दिवशी रेल्वेत नोकरी मिळावी यासाठी देशभरातून शेकडो दिव्यांग विद्यार्थी मंडी हाऊससमोर आंदोलनाला बसले होते. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

दिल्लीत सर्वात कमी ट्रॅफिक जॅम हा २१ मार्च रोजी नोंदला गेला. या दिवशी केवळ ६ टक्के होता. टॉमटॉमच्या माहितीनुसार, ट्रॅफिक इंडेक्स मध्ये एक मोठा दिलासा देणारी बाब सुद्धा समोर आली आहे. २०१८ च्या तुलनेत दिल्लीत ट्रॅफिक कंजेशन २ टक्क्यांपर्यंत कमी आला आहे. दिल्लीत नवीन रस्ते आणि नवीन बांधले गेलेले पूल हेही यामागे कारण असू शकते. ८ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या जगभरातील ५७ शहरात हा सर्व्हे करण्यात आला आहे. यात ‘टॉप’वर बेंगळुरू हे शहर आहे. या ठिकाणी ७१ टक्के कंजेशनची नोंद करण्यात आली. तर ६५ टक्क्यांसह मुंबई चौथ्या क्रमांकावर आहे. पुणे ५९ टक्क्यांसह पाचव्या स्थानावर आहे.

या टॉप १० शहरांचा समावेश…

  1. बेंगळुरू पहिल्या स्थानावर
  2. मनीला दुसऱ्या स्थानावर
  3. बगोटा तिसऱ्या स्थानावर
  4. मुंबई चौथ्या स्थानावर
  5. दिल्ली पाचव्या स्थानावर
  6. मॉस्को सहाव्या स्थानावर
  7. लीमा सातव्या स्थानावर
  8. इंस्ताबुल नवव्या स्थानावर
  9. जकार्ता दहाव्या स्थानावर
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments