Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeदेशशिक्षिकेचे पानवाल्याशी जुळले कनेक्शन,अडथळा ठरणाऱ्या पतीला केले डिसकनेक्शन!

शिक्षिकेचे पानवाल्याशी जुळले कनेक्शन,अडथळा ठरणाऱ्या पतीला केले डिसकनेक्शन!

Murderगोरखपूर: कधी कुणाचा,कुणावर मन येईल सांगता येत नाही. दोन वर्षाच्या लेकराची आई पेशाने शिक्षिका. तीचे पानटपरी वाल्याशी कनेक्शन जुडले, मात्र हे पतीला हे कळाल्यानंतर तीने प्रियकराच्या मदतीने पतीलाच जगातून डिसकनेक्शन केले. ही घटना गोरखपूर येथे घडली. मात्र या खूनाचा उलगडा पोलिसांनी उलगडला आणि तिघांना तरुंगात पाठविले.  

गोरखपूरचा रहिवासी विनोद शर्माचे लग्न सन १९९७ मध्ये रामपूर झंगहाच्या रहिवासी आशा शर्मासोबत झाले होते. लग्नाला १५ वर्षाचा कालावधी उलटला होता. दोघांना दोन मुले होती. त्यांचा संसार सुखात चालला होता. आशा शर्मा या महिला सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. दोघांचा सुखी संसार सुरु होता. त्याच्यात तिसरा आला त्यानंतर कुटुंबाचा खेळखंडोबा झाला.आशा शर्माच्या घरापासून शाळेच्या रस्त्यावर एका पानवाल्याची टपरी आहे. ती शाळेत येता-जाता पिपराईचचा पानटपरीवाला अनुप मोदनवालशी अवैध संबंध जुळले. आशा आपला प्रियकर अनुपच्या प्रेमात एवढी आकंठ बुडाली की, तिने कुणाची पर्वा केली नाही. पतीने अनेक वेळा दोघांना पकडले, तरीही तो माफ करत राहिला. ३० मार्च रोजी आरोपी महिलेने आपल्या पतीचा नेहमीचाच काटा काढला आणि संपर्ण कुटुंबल उध्दवस्त झालं.

महिला शिक्षिका आशा ने प्रियकर आरोपी अनुप मोहनवाल याला आपल्या दोघांच्या मधात तिसरा कुणी नको म्हणून तु माझा पती विनोद शर्माला नेहमीचीच कटकट मिटवण्यासाठी संपवुन टाक अशी विनंती केली. पतीला संपवल्यानंतर आपण सोबत राहू असे सांगून प्रियकराला विश्वासात घेतले. अनुपलाही आशा सोबत आयुष्य घालवायचे होते म्हणून त्यानेही होकार दिला. यासाठी त्याने एक मित्राला मदतीसाठी घेतले. ३० मार्चच्या संध्याकाळी विनोद जेव्हा बाजारातून सामान घेऊन घरी परत येत होता, यादरम्यान आरोपी अनुप आपला साथीदार संदीपसोबत भिंतीआड लपून बसला. विनोद येताच चाकूने त्याचा गळा चिरून त्याचा खून करुन दोघे फरार झाले होते.

मात्र पोलिसांनी खबऱ्यांमार्फत माहिती काढल्यानंतर आशा शर्माचे पानटपरीवाल्याशी अनैतिक संबंध होते. त्या दिशेने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपी अलगद पोलिसांच्या हाती आले. कॉल डिटेलच्या आधारे घटनेचा खुलासा झाला. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून कोर्टापुढे हजर केले, येथून त्यांना तुरुंगात पाठवले. आरोपी शिक्षिका आशाला आशाला दोन मुले आहेत. इयत्ता सातवीत शिकणारा तेरा वर्षांचा रणवीर आणि इयत्ता तिसरीत शिकणारा नऊ वर्षांचा अर्पित अशी दोन मुले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments