Friday, March 29, 2024
Homeदेश'जे मुसलमान स्वत:ला भारतीय मानतात, त्यांची भारताने घ्यावी काळजी'-ओबामा

‘जे मुसलमान स्वत:ला भारतीय मानतात, त्यांची भारताने घ्यावी काळजी’-ओबामा

नवी दिल्ली – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले, भारताला आपल्या दुसऱ्या नंबरवरती असलेल्या मुस्लिम लोकसंख्येचे पालन पोषण केले पाहिजे. जे मुस्लीम स्वत:ला भारतीय समजतात त्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घ्यावी. पुढे म्हणाले की ओसामा बिन लादेन पाकिस्तानमध्ये लपला असल्याची माहिती पाकिस्तान सरकारला असल्याचा कोणताही पुरावा आपल्याकडे नाही.

बराक ओबामा ‘हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप समिट’ मध्ये सामील होण्यासाठी आज दिल्लीत आले होते. या परिषदेत ओबामांनी २० मिनिटांचे भाषण केले. आपल्या भाषणात ओबामांनी दहशतवाद, लोकशाही, आर्थिक सुधारणा आणि जागतिकीकरणावर भाष्य केले. ओबामा म्हणाले, भारता सारख्या देशाने ‘स्किल डेव्हलपमेंट’ वर अधिक लक्ष्य केंद्रीत करावे. या कार्यक्रमात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, रॉबर्ट वाड्रा आणि वरिष्ठ काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थित होते.

ओबामा यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे – 
-ओबामा म्हणाले, आंतरराष्ट्रीय शांतता वाढविण्यासाठी आम्ही खूप काही केले. परंतु जागतिक तणाव कमी झालेला नाही.  जगात जागतिकीकरण, दहशतवाद, असमानता यासारख्या मुद्द्यांनी तणाव वाढवला आहे.
– कम्युनिकेशनमुळेच लोकांना खरी शक्ती मिळते व आज जग खऱ्या अर्थाने कनेक्टेड आहे. परंतु त्याचबरोबर जगात फुटीरतावादी शक्तीही अस्तित्वात आहेत.
-बराक ओबामा म्हणाले, राष्ट्राध्यक्ष असताना दोन वेळा भारत दौऱ्यावर येणार मी पहिला अमेरिकी राष्ट्राध्यक्ष आहे. मी व्हाइट हाउसमध्ये दिवाळी साजरी करण्याची परंपरा सुरू केली. माझ्या कार्यकाळात भारत आणि अमेरिकेमधील संबंध ऐतिहासिक ऊंचीवर जाऊन पोहोचले. दोन्ही देशांमध्ये अनेक समानता आहेत.
– भारत आणि अमेरिकेत अनेक गोष्टी एकसारख्या आहेत.  लोकशाही, संविधान, व नितीमूल्ये दोन्ही देशात सर्वोपरि आहेत. परंतु आता अशी वेळ आहे, की लोकशाही व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
– भारतासारख्या देशाने कौशल्य विकास कार्यक्रमावर अधिक भर देण्याची गरज आहे. त्यामुळे युवकांनी रोजगार मिळेल व त्यांचे भविष्य सुखकर होईल. ऑटोमेशन व आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.
– आज इंटरनेटच्या माध्यमातून बनावट प्रोपेगंडा चालवला जात आहे. ही बाब लोकशाहीसाठी मारक ठरू शकते. माणसा-माणसांमध्ये केला जाणारा भेद विनाशकारी ठरू शकतो.
-ओबामांनी मोदी व मनमोहन सिंह दोघेही आपले खास मित्र असल्याचे सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments