Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशनाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा; आज रात्रीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदी निवडीची...

नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा; आज रात्रीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदी निवडीची घोषणा

मुंबई: नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी आज विधिमंडळ कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे हा राजीनामा सुपूर्त केला आहे. काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदासाठी त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असतानाच त्यांनी हा राजीनामा दिला. नाना पटोले यांचे नाव काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी आज रात्रीच जाहीर केले जाणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.

नाना पटोले यांनी राजीनामा देण्यापूर्वी सह्याद्री गेस्ट हाऊस येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांकडे आभार व्यक्त करण्यासाठी ही भेट घेतल्याचे म्हटले जात आहे.

पटोलेंनी घेतली होती राहुल गांधींची भेट

दरम्यान राज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चा असतानाचा नाना पटोले यांनी अलिकडेच राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीत राहुल गांधी आणि पटोले यांच्यात काय चर्चा झाली हे अद्याप समजू शकले नाही. या भेटीनंतर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments