नॅनोसाठी ३३ हजार कोटी दिले, नॅनो कार रस्त्यावर दिसली नाही – राहुल गांधी

- Advertisement -

अहमदाबाद – काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सध्या आपले सर्व लक्ष गुजरात विधानसभेची निवडणूक जिंकण्याकडे केंद्रीत केले आहे. मागच्या काही दिवसांपासून ते सतत गुजरातचा दौरा करत आहेत. नवसर्जन यात्रेदरम्यान शुक्रवारी पारडीमध्ये सभेला संबोधित करताना राहुल गांधींनी टाटा नॅनो प्रकल्पावरुन भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री असताना नॅनो कारचा प्रकल्प गुजरातमध्ये आणला होता. 

त्याच नॅनो प्रकल्पावरुन राहुलनी भाजपावर टीका केली. नॅनो प्रकल्पासाठी ३३ हजार कोटी दिले पण मागच्या १० ते १५ दिवसात मला एकही नॅनो कार रस्त्यावर धावताना दिसली नाही. गुरुवारीही एका सभेला संबोधित करताना राहुल यांनी हाच मुद्दा उपस्थित करत गुजरात मॉडेलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. शेतक-यांकडून जमिनी घेऊन उद्योजकांना दिल्या. त्याबरोबर पाणी आणि वीजही दिली. पण उद्योजकांनी कशाचीही परतफेड केली नाही. हेच गुजरातच्या विकासाचे मॉडेल आहे का ? असा सवाल राहुल यांनी विचारला.

- Advertisement -