Thursday, March 28, 2024
Homeदेशनथुराम गोडसे भारताचा पहिल्या क्रमांकाचा दहशतवादी-ओवेसी

नथुराम गोडसे भारताचा पहिल्या क्रमांकाचा दहशतवादी-ओवेसी

Asaduddin Owaisiनवी दिल्ली – मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी नथुराम गोडसे भारताचा पहिल्या क्रमांकाचा दहशतवादी असल्याचे विधान केले आहे. गोडसे प्रकरणावरुन पुन्हा भाजपा आणि ओवेसी आमने सामने येण्याची शक्यता आहे.

नथुराम गोडसेला भारताचा पहिल्या क्रमांकाचा दहशतवादी  म्हणताना ओवेसी म्हणाले की, असे बोलल्याने पोलिसांनी मला नोटीस पाठवली तरी चालेल. मला काहीही फरक पडणार नाही. आम्ही कधीही देशाचा सौदा केला नाही आणि करणार देखील नाही. गेल्या ७० वर्षांपासून आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आम्ही घाबरणार नाही.
यावेळी बोलताना ओवेसी यांनी नोटीस दिली तरी महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या व भारतातील क्रमांक एकचा दहशतवादी नथुराम गोडसेविरोधात बोलत राहणार असल्याचेही नमुद केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments