Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeदेशराष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव डी. पी. त्रिपाठी यांचे निधन

राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव डी. पी. त्रिपाठी यांचे निधन

DP Tripathiनवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महासचिव माजी खासदार डी. पी. त्रिपाठी यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. अखेर आज गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. डी. पी. त्रिपाठी  यांच्या जाण्याने उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रवादी पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

डी. पी. त्रिपाठी काँग्रेस पक्षातून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र, काही वर्षांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात जाऊन त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. विशेष म्हणजे राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून ते पक्षात होते. डी. पी. त्रिपाठी यांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी घनिष्ठ संबंध होते.

डी. पी. त्रिपाठी यांच्या निधनाची बातमी कळताच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर दु:ख व्यक्त केले आहे. ‘डी. पी. त्रिपाठी यांच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर फार वाईट वाटले. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव होते. ते आमच्या सर्वांचे मार्गदर्शक होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्यादिवशी त्यांनी केलेले मार्गदर्शन आयुष्यभर लक्षात राहील. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो’, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

विद्य़ार्थी संघटनेपासून सुरुवात…

डी. पी. त्रिपाठी यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९५२ रोजी उत्तर प्रदेशमधील सुल्तानपूर येथे झाला होता. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण हे दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) झाले असून ते जेएनयू विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होऊन गेले आहेत. त्यांनी काँग्रेस पक्षातून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments