झाकिर नाईकविरोधात एनआयएने दाखल केले आरोपपत्र

- Advertisement -

नवी दिल्ली: वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक झाकिर नाईकविरोधात राष्ट्रीय तापास यंत्रणेने (NIA) गुरुवारी आरोपपत्र दाखल केले. तरुणांना दहशतवादी कारवायांसाठी प्रोत्साहित करणे आणि घाणाघाती भाषणांचे आरोप नाईकवर लावण्यात आले आहेत.  आपल्या खासगी टिव्ही चॅनेलच्या माध्यमांतून मुस्लिम धर्माचा कट्टरपणे प्रचार करणाऱ्या ५१ वर्षीय झाकिर नाईकच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहार आणि दहशतवादासंबंधी चौकशी केली जात आहे.

गेल्या वर्षी बांगलादेशातील काही दहशतवाद्यांनी आपण नाईकच्या भाषणांनी प्रभावित होऊन हा मार्ग स्वीकारल्याचे सांगितले होते. त्यानंतर नाईकविरोधात चौकशी सुरु करण्यात आली होती. दरम्यान, १ जुलै २०१६ मध्ये नाईक भारतातून दुबईला एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेला मात्र, पुन्हा भारतात परतला नाही. यानंतर एनआयएने १८ नोव्हेंबर २०१७ रोजी आपल्या मुंबई शाखेद्वारे नाईकविरोधात भादंवि अंतर्गत आणि बेकायदा कारवाई अधिनियमांतर्गत नाईकविरोधात एक खटला दाखल करण्यात आला.

दरम्यान, एनआयएच्या या कारवाईपूर्वीच गृहमंत्रालयाने मुंबईमधील त्याच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेला बेकायदा घोषित केले होते. नाईकने सौदी अरेबियाचे नागरिकत्व स्विकारल्याचे बोलले जात आहे मात्र, अद्याप याचा खुलासा झालेला नाही.

- Advertisement -
- Advertisement -