Friday, March 29, 2024
Homeदेशआसाममध्ये CAA ला विरोधकरणा-या अखिल गोगाईंच्या घरावर छापा

आसाममध्ये CAA ला विरोधकरणा-या अखिल गोगाईंच्या घरावर छापा

गुवाहाटी : सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात देशात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु आहे. विशेष म्हणजे ईशान्य भारतापासून विरोधाचा भडका उडाला होता. या कादयाला विरोध करणारे आसाममधील आंदोलक शेतकरी नेते अखिल गोगोई यांच्या घरावर आज गुरुवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) छापे घातले. गोगोई सध्या एनआयए कोठडीत असून बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्यानुसार (युएपीए) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आसाममध्ये झालेल्या हिंसक आंदोलनप्रकरणी त्यांना १२ डिसेंबर रोजी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी गोगोई यांचा ताबा एनआयएकडे सोपवला होता. १७ डिसेंबर रोजी गोगोईयांना एनआयए विशेष कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी कोर्टाने गोगोई यांना १० दिवसांची एनआयए कोठडी सुनावली होती.

आसाममधील कृषक मुक्ती संग्राम समितीचे अखिल गोगोई नेते आहेत. संसदेत सुधारीत नागरिकत्व कायदा मंजूर झाल्यानंतर ईशान्य भारतात मोठे आंदोलन सुरू झाले होते. आसाममध्ये आंदोलनाला काहीसे हिंसक वळण देखील लागले होते. त्यानंतर पोलिसांनी राज्यभरातील आंदोलकांची धरपकड केली. अखिल गोगोईयांना १२ डिसेंबर रोजी जोहरत जिल्ह्यातून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी गोगोई यांना एनआयएकडे सोपवले होते.

गोगोईंच्या विरोधात या कलमाखाली गुन्हा दाखल…

अखिल गोगोईयांच्या विरोधात एनआयएने कलम १२० (ब), १२४(अ). १५३(अ), १५३ (ब) आणि युएपीए कायद्यातील कलम १८ व ३९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अखिल गोगोई हे भाजपविरोधी नेते समजले जातात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments