Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeदेशनीरव मोदीचा वकिल बरडला; म्हणे नीरव मोदीही निर्दोष सुटेल'!

नीरव मोदीचा वकिल बरडला; म्हणे नीरव मोदीही निर्दोष सुटेल’!

नवी दिल्ली: हिरे व्यापारी व पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी यांच्यावरील आरोप सिद्ध होऊ शकत नाहीत. २ जी व बोफोर्स घोटाळ्याप्रमाणे हे प्रकरणही निकालात निघेल, असे नीरव मोदी यांचे वकील विजय अग्रवाल यांनी म्हटले आहे.

नीरव हा पीएनबीला दररोज बनवाबनवीचे उत्तरे देऊ लागला. कधी म्हणतो दर महिण्याला ५० कोटी रुपये देऊन कर्ज फेडतो. तर कधी बोलतो माझा व्यवसाय ठप्प झाला. तर कधी म्हणतो मी कर्ज फेडू शकत नाही. याचाच अर्थ त्याला पैसा द्यायचा नाही. म्हणून तो दिशाभूल करत आहेत. तपास यंत्रणा याप्रकरणी न्यायालयात नीरव मोदी यांच्या विरोधातील आरोप सिद्ध करू शकत नाही. तपास यंत्रणांनी मीडियामध्ये कितीही कांगावा केला तरी न्यायालयात त्यांना नीरव मोदींवरील आरोप सिद्ध करता येणार नाहीत. मला खात्री आहे, नीरव मोदी यातून निर्दोष सुटतील, असेही अग्रवाल म्हणाले.सक्तवसुली संचालनालय व सीबीआय या प्रकरणाची चौकशी करत आहेत. तसेच नीरव मोदी व गीतांजली जेम्सशी संबंधित असलेल्या मालमत्तांवर छापासत्र सुरू आहे.
नीरव मोदी व गितांजली जेम्सचा व्यवस्थापकीय संचालक मेहूल चोस्की यांच्यावर या घोटाळ्याचा आरोप आहे.२०११ मध्ये या घोटाळ्याला सुरुवात झाली. यावर्षी जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात हा घोटाळा उघडकीस आला. त्यानंतर पीएनबीच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांना याची माहिती दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments