Placeholder canvas
Thursday, April 18, 2024
Homeदेशनिर्भया अत्याचार : दोषींना फाशीच; याचिका फेटाळली!

निर्भया अत्याचार : दोषींना फाशीच; याचिका फेटाळली!

Nirbhaya Mother and Accused,Nirbhaya Case,Nirbhaya
Image: DNA

नवी दिल्ली : निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या दोषींची क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. विनय शर्मा आणि मुकेश या दोघांनी ही याचिका केली होती. जी सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. न्या. आर भानुमती आणि अशोक भूषण यांच्या ५ न्यायाधीशांच्या पिठाने ही याचिका फेटाळली आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या निर्णयामुळे चारही दोषींना फासावर लटकवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे निर्धारित दिवशी आणि त्याच वेळी निर्भया बलात्कार प्रकरणातल्या चारही दोषींना फाशी देण्यात येणार आहे.

दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणी चारही दोषींना २२ जानेवारी रोजी फाशी देण्यात येणार आहे. ७ जानेवारी रोजी दिल्ली न्यायालयाने हा निर्णय देत डेथ वॉरंट जारी केलं होतं. या डेथ वॉरंटमध्ये ७ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता या चारही दोषींना फाशी देण्यात येणार असल्याची बाब नमूद करण्यात आली होती.

दरम्यान त्याच दिवशी आमच्या पक्षकारांना क्युरेटिव्ह याचिका दाखल करायची आहे असा युक्तीवाद आरोपींच्या वकिलांनी केला होता. त्यानुसार ही याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र ती सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.

क्युरेटिव्ह याचिका म्हणजे काय?…

क्युरेटिव्ह याचिकेद्वारे दोषी न्यायालयाने दिलेल्या निर्णयातील तांत्रिक बाबींवर प्रकाश टाकून त्यात कुठे सुधारणा करण्याची आवश्यकता आहे हे सूचवून प्रश्न उपस्थिक करू शकतो. मात्र, त्या साठी ज्येष्ठ वकिलाच्या शिफारशीची आवश्यकता असते. ज्येष्ठ वकिलाच्या शिफारशीशिवाय क्युरेटिव्ह याचिका दाखल होत नाही. क्युरेटिव्ह याचिकेवर चेंबरमध्ये सुनावणी घेण्यात येते. सुप्रीम कोर्टाने जरी क्युरेटिव्ह याचिका दाखल केली, तरी देखील दोषी दयेचा अर्ज करू शकतो.

 काय आहे निर्भया प्रकरण?…

१६ डिसेंबर २०१२ रोजी निर्भयावर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिचा अत्यंत क्रूर पद्धतीने लैंगिक छळही करण्यात आला. या अत्याचारामुळे निर्भयाच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या. या जखमांशी झुंज देत उपचार घेत असताना निर्भयाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशात संतापाची लाट उसळली होती.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments