Friday, March 29, 2024
Homeदेशनिर्भया : दोषी पवनची याचिका फेटाळली; चौथ्यांदा डेथ वॉरंट?

निर्भया : दोषी पवनची याचिका फेटाळली; चौथ्यांदा डेथ वॉरंट?

Pawan Kumar Gupta,Nirbhaya Case,Pawan Kumar Gupta Nirbhaya,Pawan Kumar, Gupta,Pawan Gupta,Pawan, Kumar,Nirbhaya Convicts,Nirbhaya Accused,Nirbhaya Gangrape Case,Nirbhayaनवी दिल्ली : दिल्लीच्या निर्भया सामूहिक बलात्कार, हत्या प्रकरणातील दोषी पवन गुप्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दया याचिका केली होती. ही याचिका राष्टपतींनी फेटाळून लावली आहे. मात्र, याचिकेमुळे आरोपींची फाशी तिसऱ्यांदा लांबणीवर पडली आहे. आता लवकरच नवीन डेथ वॉरंट जारी करण्यात येणार आहे.

निर्भया हत्या प्रकरणात यापूर्वीच्या आदेशानुसार, चारही दोषींना मंगळवारी (३ मार्च) सकाळी ६ वाजता फाशी दिली जाणार होती. या चौघांच्या फाशीची अंमलबजावणी आतापर्यंत तिसऱ्यांदा पुढे ढकलली गेली आहे. त्यात दोषी पवन गुप्ता याने राष्ट्रपतींकडे दया याचिका केली होती. त्यामुळे राष्ट्रपती निर्णय देईपर्यंत फाशीची अंमलबजावणी होऊ शकत नाही, असा निर्णय अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेद्र राणा यांनी दिला होता.

‘पवन गुप्ताने दया याचिका केल्यामुळे सर्व दोषींविरुद्धच्या ‘डेथ वॉरंट’ची अंमलबजावणी राष्ट्रपतींनी निर्णय देईपर्यंत  लांबणीवर टाकण्यात येत आहे’, असा निर्णय न्यायालयाने दिला होता. पवन गुप्ताने सोमवारी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. तशी माहिती त्यानं न्यायालयाला दिली होती. त्याचबरोबर फाशीच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी, अशी मागणीही केली होती.

फाशीचा मार्ग मोकळा…

पवन गुप्ताच्या दया याचिकेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी दुपारी निर्णय दिला. राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळली असून, आरोपींच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला आहे. चारही आरोपींना फाशी देण्यासंदर्भात लवकरच डेथ वॉरंट जारी करण्यात येणार असल्याचं वृत्त आहे.

मुकेश कुमार सिंह (३२), पवन गुप्ता (२५), विनय कुमार शर्मा (२६) आणि अक्षय कुमार सिंह (३१) या चौघांविरुद्ध नव्याने ‘डेथ वॉरंट’ जारी कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments