Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशनिर्भयाच्या खून्यांचा आता नवा फंडा!

निर्भयाच्या खून्यांचा आता नवा फंडा!

नवी दिल्ली : दिल्लीतील निर्भया गँगरेप प्रकरणाला आला नवं वळण लागलं आहे. फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या चारही दोषींच्या नातेवाईकांनी आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पत्र लिहून इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. इच्छामरणाची मागणी करणाऱ्यांमध्ये दोषींचे वयोवृद्ध आई-वडील, भाऊ-बहीण आणि त्यांच्या मुलांचा समावेश आहे.
निर्भयाच्या दोषींनी राष्ट्रपतींना हिंदीत पत्र लिहिले आहे. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि निर्भयाच्या आई-वडिलांना आम्ही विनंती करतो की, आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्यावी. भविष्यातील बलात्काराच्या घटना आमच्या मृत्युने रोखले जाऊ शकतात. दोषींच्या नातेवाईकांना इच्छामरण दिल्यास निर्भया सारखी दुसरी घटना होणार नाही.
दोषींच्या नातेवाईकांनी सांगितलं की, असं कोणतंच पाप नाही के त्याला माफ केलं जाऊ शकत नाही. या आधी देशात अनेक महापापींनी माफ करण्यात आलं होतं. सूड घेण्याची व्याख्या म्हणजे शक्ती नाही. क्षमा करणे हीच मोठी शक्तीचं उदाहरण आहे.
आधीच फेटाळल्या दया याचिका…
निर्भयाच्यार दोषींची दया याचिका राष्ट्रपती राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांनी आधीच फेटाळली आहे. दोषी अक्षय सिंह ठाकूर याने नवी दया याचिका दाखल केली आहे. दरम्यान, निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणी सर्व दोषी विनय शर्मा, अक्षय सिंह ठाकूर, पवन गुप्ता आणि मुकेशला 20 मार्चला पहाटे पाच वाजता फालावर लटकावण्यात येणार आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments