Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeदेशनिर्भयाच्या खून्यांना ‘या’ तारखेला होणार फाशी!

निर्भयाच्या खून्यांना ‘या’ तारखेला होणार फाशी!

नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार, हत्या प्रकरणातील दोषींना शुक्रवारी २० मार्चला होणा-या फाशीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पतियाळा हाऊस न्यायालयानं चारही दोषींची फाशीची शिक्षा रद्द करण्यास नकार दिला आहे.

निर्भयाच्या दोषींचे वकिल सर्व दोषींना वाचवण्यासाठी वारंवार नवनवीन प्रकार करत आहेत. दरम्यान, पतियाळा हाऊस कोर्टात सुनावणी सुरू असताना कोर्टरूममध्ये वेगळचं चित्र दिसून आलं. दोषी अक्षय कुमारच्या पत्नी न्यायाधीशांसमोर रडू लागली. अक्षयकुमारच्या पत्नीने निर्भयाची आई आशादेवी यांचे पाय पकडून आपल्या नवऱ्याची फाशी रोखा अशी विनंती केली. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता निर्भयाच्या दोषींच्या फाशीकडे लागल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments