Friday, March 29, 2024
Homeदेशनिर्भयाच्या खून्यांचा तिसऱ्यांदा डेथ वॉरंट!

निर्भयाच्या खून्यांचा तिसऱ्यांदा डेथ वॉरंट!

नवी दिल्ली : निर्भयाच्या दोषींविरुध्द पटियाला हाऊस न्यायालयाकडून डेथ वॉरंट जारी करण्यात आलंय. ३ मार्च रोजी सकाळी ६.०० वाजता निर्भयाच्या दोषींना फासावर चढवण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत.

मुकेश कुमार सिंह (३२), पवन गुप्ता (२५), विनय कुमार शर्मा (२६) आणि अक्षय कुमार (३१) अशी या दोषींची नावं आहेत. आपल्याकडे अजूनही कायदेशीर पर्याय उपलब्ध असल्याचा दावा दोषींचे वकील ए पी सिंह यांनी केलाय. दोषींच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, अक्षयसाठी ते नवी दया याचिका करणार आहेत. पवनकडेही क्युरेटीव्ह पिटिशन आणि राष्ट्रपतींकडे दया याचिका पाठवण्याचे पर्याय उपलब्ध आहेत.

निर्भयाच्या आई-वडिलांनी याचिका केली होती दाखल…

११ फेब्रुवारी रोजी निर्भयाच्या आई-वडिलांनी दोषींविरुद्ध डेथ वॉरंट काढण्यासाठी याचिका दाखल केली होती. यापूर्वी पटियाला हाऊस न्यायालयानं डेथ वॉरंटमध्ये २२ जानेवारी रोजी दोषींना फासावर लटकावण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुन्हा एकदा १ फेब्रुवारी फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाणार होती. परंतु, न्यायालयानं ३१ जानेवारी रोजी एका याचिकेवर सुनावणी करताना या शिक्षेची अंमलबजावणी थांबवली होती. हे सगळे दोषी न्याय प्रक्रियेशी खेळत असल्याचा आरोप निर्भयाच्या आई-वडिलांनी केला होता.

अखेर डेथ वॉरंट निघालं याचं समाधान आहे...

आज तिसऱ्यांदा दोषींविरुद्ध डेथ वॉरंट काढण्यात आलंय. यासाठी आम्हाला अधिक त्रास सहन करावा लागला. परंतु, अखेर डेथ वॉरंट निघालं याचं समाधान आहे. ३ मार्च रोजी दोषी फासावर चढतील, अशी मी आशा करते, अशी प्रतिक्रिया या निकालानंतर निर्भयाची आई आशा देवी यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments