Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeदेशमहंत सिताराम दास यांना न्यूजपेपर्स असोसीएशन ऑफ इंडियाचा बेस्ट स्पिरिचुअल लीडर पुरस्कार

महंत सिताराम दास यांना न्यूजपेपर्स असोसीएशन ऑफ इंडियाचा बेस्ट स्पिरिचुअल लीडर पुरस्कार

नवी दिल्ली: निर्मोही आखाड्याचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि आध्यात्किम गुरु महंत सिताराम दास यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. महंत सिताराम दास यांना न्यूजपेपर्स असोसीएशन ऑफ इंडियाच्या बेस्ट स्पिरिचुअल अवार्डने सन्मानित करण्यात आले आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्री.राम चंद्राच्या मंदिर निर्माणासाठी महंत सिताराम दास यांचे मोठे योगदान आहे. अध्यात्मिक क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

न्यूजपेपर्स असोसीएशन ऑफ इंडियाचा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला. या सोहळयात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणा-या सर्व क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. महंत सिताराम दास हे विश्वविख्यात अध्यात्मिक गुरु असून त्यांना मानणारा आणि त्यांचे प्रवचन ऐकणारा मोठा वर्ग आहे. विशेष म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्री.राम चंद्र, श्री.कृष्ण यांच्यासह धार्मिक विषयांवर त्यांचे मार्गदर्शन लाख मोलाचे असतात. सोशल मिडियावर त्यांचे सर्व प्रवचन उपलब्ध आहेत.

महंत सिताराम दास हे निर्मोही आखाड्याचे राष्ट्रीय प्रवक्ते असून श्री.राम मंदिराबाबतचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. महंत सिताराम दास यांनी अयोध्येमध्ये श्री.राम मंदिरासाठी मोठे योगदान आहेत. देशपातळीवर त्यांचे कार्य खूप मोठे आहेत. दिवसरात्र मेहनत करुन त्यांनी या कार्यासाठी स्वत:ला झोकून दिले हे विशेष.

महंत सिताराम दास यांनी संपूर्ण आयुष्य समाजासाठी आणि आध्यात्मिक क्षेत्रासाठी सेवेसाठी अर्पण केले आहे. त्यांच्या संपूर्ण सेवाकार्याची दखल घेऊन त्यांना न्यूजपेपर्स असोसीएशन ऑफ इंडियाने बेस्ट स्पिरिचुअल पुरस्काराने सन्मानित केले आहेत.

मुंबईचे सुप्रसिध्द कॉस्मेटोलॉजिस्ट डॉ.अंशुमन मनस्वी यांना बेस्ट डॉक्टर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच वैदेही एस्थेटिक यांनी कोविडमध्ये जवळपास 50 हजारांपेक्षाही जास्त लोकांना मदत केली. याची दखल घेऊन त्यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यांच्यासह इतर क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देण्यात आले.

हेही वाचा : धक्कादायक!मुख्यमंत्र्यांनी सही केल्यानंतर फाईलमधला शेराच बदलला

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments