Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeदेश'आता धार्मिक स्थळांच्या रंगावरुन रंगणार राजकारण?

‘आता धार्मिक स्थळांच्या रंगावरुन रंगणार राजकारण?

रामपूर – लखनौ येथील हज हाऊसच्या भिंतीला बाहेरील बाजूस शुक्रवारी भगवा रंग देण्यात आला. हा रंग प्रामुख्याने हिंदुत्ववादाशी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहे. यावर बोलताना समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी, आता मशिदीही केव्हा भगव्या होतात याची वाट बघतोय, असे म्हटले आहे. धार्मिक स्थळांच्या रंगावरुन राजकारण रंगणार आहे.

यावेळी, योगी सरकार इतर धर्मियांकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप आझम खान यांनी केला आहे. तसेच सरकारच्या आदेशाप्रमाणे आमचे कपडेही केव्हा भगवे होतील याचीही वाट बघतोय, असेही ते म्हणाले. योगी सरकारच्या कारणाम्यामुळे धार्मिक स्थळांचे राजकारण तापायला सुरुवात झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments