Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशपोलिसांचा नियम डावलून हार्दिकचा 'रोड शो'

पोलिसांचा नियम डावलून हार्दिकचा ‘रोड शो’

अहमदाबाद – पाटीदार अनामत आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पटेल याच्या ‘रोड शो’ला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र, त्यानंतर ही हार्दिक पटेल यांनी अहमदाबादमध्ये रोड शो केला. या रोडशोमध्ये जवळपास २ हजाराहून अधिक दुचाकीस्वार सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.

अहमदाबाद पोलीस प्रशासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि हार्दिक पटेल या तिघांच्याही रोड शोला परवानगी नाकारली होती. पंतप्रधान मोदींच्या रोड शोसाठी भाजपने पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. मात्र, प्रशासनाने त्यास नकार दिला. त्यामुळे मोदींचा रोड शो रद्द करण्यात आला. त्याप्रमाणेच काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याही रोड शो कार्यक्रमास परवानगी नाकारण्यात आली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments