दिलासा : पॅनकार्ड, आधार कार्ड जोडणीसाठी पुन्हा मुदत वाढ

- Advertisement -

Aadhar Card Linking Pan card link
नवी दिल्ली : केंद्र सरकारने पॅनकार्ड – आधार कार्ड जोडणीसाठी पुन्हा मुदतवाढ दिली आहे. या अगोदर पॅनकार्ड – आधार कार्ड जोडणीसाठी ३० सप्टेंबर ही मुदत देण्यात आली होती. तर, आता नवी अंतिम मुदत ३१ डिसेंबर देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

केंद्र सरकारने आधारशी जोडणी करणे बंधनकारक केले आहे. जे कोणी असे करणार नाही त्यांचे पॅनकार्ड अवैध मानले जाणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत २०१९ पॅनकार्ड व आधारकार्ड जोडणी केली नाही तर, तुमचे पॅनकार्ड वापरात राहणार नाही. या अगोदर असा नियम होता की जर ठरलेल्या मुदतीत तुम्ही पॅनकार्ड व आधार कार्ड जोडणी केली नाहीतर, तुमचे पॅनकार्ड अवैध समजले जाईल. तुमच्याकडे पॅनकार्ड नाही असे मानले जाईल.

१ जानेवारी २०२० पासून जोपर्यंत तुम्ही पॅनकार्डला आधारकार्डशी जोडत नाहीत. तोपर्यंत प्राप्तिकर, गुंतवणूक किंवा कर्ज इतर संबधित कामं करता येणार नाही. परंतु मुदतवाढ दिल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -
- Advertisement -