Placeholder canvas
Tuesday, April 16, 2024
Homeदेशसुशासन आणि विकासाच्या राजकारणाला जनतेचा पाठिंबा : मोदी

सुशासन आणि विकासाच्या राजकारणाला जनतेचा पाठिंबा : मोदी

नवी दिल्ली : सुशासन आणि विकासाच्या राजकारणाला जनतेचा पाठिंबा असल्याचं गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालातून समोर आलं आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही राज्यातील भाजप कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आहे.

गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील जनतेचे मोदींनी आभारही मानले. विकासाचा हा प्रवास असाच सुरु राहिल. दोन्ही राज्यातील जनतेची अविरतपणे सेवा करु, असं आश्वासन मोदींनी दिलं. ट्वीट करुन मोदींनी जनतेचे आभार मानले.
अत्यंच चुरशीच्या बनलेल्या गुजरातमध्ये भाजपने बहुमतापेक्षाही जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. तर सुरुवातीला मुसंडी मारलेल्या काँग्रेसची नंतरच्या फेरीमध्ये पिछेहाट झाली. पंतप्रधान मोदींसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली होती. तर काँग्रेसनेही संपूर्ण ताकद पणाला लावली होती.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या सर्व 182 जागांचे कल हाती आले आहेत. काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर असताना, प्रत्येक पक्षासाठी एक-एक मत बहुमूल्य ठरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments