Friday, March 29, 2024
Homeदेशआपल्या शहरात पेट्रोल-डिझेलचे भाव काय?; एका क्लिकवर जाणून घ्या

आपल्या शहरात पेट्रोल-डिझेलचे भाव काय?; एका क्लिकवर जाणून घ्या

नवी दिल्ली: सरकारी तेल कंपन्यांनी दोन दिवसांच्या वाढीनंतर आज पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ केलेली नाही. काल दोन्ही इंधनांच्या किमतीत 30 पैसे प्रतिलिटर वाढ झाली होती. यानंतर दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर 86.95 रुपये तर डिझेल 77.13 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच दोन्ही इंधनांच्या किमती अधूनमधून वाढल्या आहेत, ज्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत.

गेल्या एका वर्षात पाहिले तर पेट्रोलच्या किमतीत 14 रुपयांपेक्षा जास्त वाढ झालीय. पेट्रोल आणि डिझेलची किंमत सतत वाढत असल्यानं विक्रमी पातळीवर पोहोचलीय. इंधनाच्या किमती वाढल्यामुळे महागाईही वाढते. त्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर होतो.

आपल्या शहरात पेट्रोल डिझेलची किंमत किती?

दिल्लीत पेट्रोल 86.95 रुपये तर डिझेल 77.13 रुपये प्रतिलिटर आहे.

मुंबईत पेट्रोल 93.49 रुपये तर डिझेल 83.99 रुपये प्रति लिटर आहे.

कोलकातामध्ये पेट्रोल 88.30 रुपये तर डिझेल 80.71 रुपये प्रतिलिटर आहे.

 चेन्नईमध्ये पेट्रोल 89.39 रुपये तर डिझेल 82.33 रुपये प्रतिलिटर आहे.

 बेंगळुरूमध्ये पेट्रोल 89.85 रुपये तर डिझेल 81.76 रुपये प्रतिलिटर आहे.

 नोएडामध्ये पेट्रोल 86.14 रुपये तर डिझेल 77.54 रुपये प्रतिलिटर आहे.

 गुरुग्राममध्ये पेट्रोल 85.02 रुपये आणि डिझेल 77.69 रुपये प्रति लिटर आहे.

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता. त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments