Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeदेशबेंगळुरूमध्ये एरो इंडिया २०२३: पंतप्रधान मोदींनी केले उद्घाटन

बेंगळुरूमध्ये एरो इंडिया २०२३: पंतप्रधान मोदींनी केले उद्घाटन

पाच दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात स्वदेशी उपकरणे / तंत्रज्ञान प्रदर्शित करणे आणि परदेशी कंपन्यांसोबत भागीदारी करणे यावर भर असेल.

Airo India 2023
PM Narendra Modi
Bemgaluruपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी बेंगळुरू येथे आशियातील सर्वात मोठ्या एअर शो एरो इंडिया २०२३ च्या १४ व्या आवृत्तीचे उद्घाटन केले.

प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी मेगा एअर शोच्या उद्घाटन समारंभात फ्लायपास्ट दरम्यान गुरुकुल रचनेचे (Gurukul Formation) नेतृत्व केले.

पाच दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात स्वदेशी उपकरणे / तंत्रज्ञान प्रदर्शित करणे आणि परदेशी कंपन्यांसोबत भागीदारी करणे यावर भर असेल.

पंतप्रधान कार्यालयानुसार, Aero India 2023 ची थीम “द रनवे टू अ बिलियन अपॉर्च्युनिटीज” आहे. या कार्यक्रमामुळे देशांतर्गत एमएसएमई आणि स्टार्ट-अप्सना जागतिक पुरवठा साखळीत एकत्रित करण्यात आणि विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात मदत होईल.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित करत, कार्यक्रमात सुमारे १०० राष्ट्रांची उपस्थिती दर्शवते की भारतावरील जगाचा विश्वास अनेक पटींनी वाढला असल्याचे सांगितले.
.
“एरो इंडिया हे भारताच्या वाढत्या क्षमतेचे एक उदाहरण आहे. येथे सुमारे १०० राष्ट्रांची उपस्थिती दर्शवते की भारतावरील जगाचा विश्वास वाढला आहे. भारत आणि जगातील ७०० हून अधिक प्रदर्शक सहभागी होत आहेत. याने भूतकाळातील सर्व गोष्टी मोडून काढल्या आहेत.,” असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, “एक काळ होता जेव्हा एरो इंडियाला फक्त शो समजले जायचे, परंतु गेल्या काही वर्षांत हा दृष्टिकोन बदलला आहे. एरो इंडिया नवीन भारताचा नवीन दृष्टिकोन प्रतिबिंबित करते. एक काळ असा होता की तो फक्त एक शो मानला जात होता. गेल्या काही वर्षांत, देशाने ही धारणा बदलली आहे. आज, हा केवळ एक शो नाही तर भारताचे शक्ती प्रदर्शन देखील आहे. आज भारत हा केवळ एक बाजारपेठ नसून एक संभाव्य संरक्षण भागीदार देखील आहे.”

एरो इंडिया २०२३ मध्ये ८० हून अधिक देशांचा सहभाग होता. एरो इंडिया २०२३ मध्ये सुमारे ३० देशांचे मंत्री आणि जागतिक आणि भारतीय OEM चे ६५ सीईओ सहभागी होण्याची शक्यता आहे.

एरो इंडिया २०२३ प्रदर्शनात सुमारे १०० परदेशी आणि ७०० भारतीय कंपन्यांसह ८०० हून अधिक संरक्षण कंपन्यांचा सहभाग होता. प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या भारतीय कंपन्यांमध्ये MSME आणि स्टार्ट-अप यांचा समावेश आहे, जे विशिष्ट तंत्रज्ञानाची प्रगती आणि देशातील एरोस्पेस आणि संरक्षण क्षमतांमध्ये वाढ दर्शवतील.

एरो इंडिया २०२३ मधील प्रमुख प्रदर्शकांमध्ये एअरबस, बोईंग, दासॉल्ट एविएशन, लॉकहिड मार्टिन, इस्राएल एरोस्पेस इंडस्ट्री , ब्राह्मोस एरोस्पेस, आर्मी एव्हिएशन, एचसी रोबोटिक्स, एस ए ए बी, सॅफ्रान, रोल्स रॉयस, लार्सन अँड टुब्रो, भारत फोर्ज लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL) आणि BEML लिमिटेड. यांचा समावेश आहे.

पाच दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात एरोस्पेस आणि संरक्षण क्षमतांमध्ये भारताची वाढ प्रदर्शित करण्यात येईल.

Web Title: PM Modi inaugurates Aero India 2023 in Bengaluru

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments