Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeदेशनीरव मोदी प्रकरणामुळे जेटलींवर, मोदी नाराज : पृथ्वीराज चव्हाण

नीरव मोदी प्रकरणामुळे जेटलींवर, मोदी नाराज : पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर नाराज आहेत. अर्थमंत्र्यांच्या राजीनाम्याचा निर्णयही ते घेऊ शकतात, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

मोदी जेटलींवर नाराज असल्यामुळे त्यांचा राजीनामा घेऊ शकतात. मात्र जेटलींनी यावर स्पष्टीकरण न दिल्यास त्यांच्या राजीनाम्याची आम्हीच मागणी करु, असा इशाराही पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एकीकडे नीरव मोदी प्रकरणी विरोधक मोदींवर निशाणा साधत आहेत. मोदींनी या प्रकरणात अद्याप मौन बाळगलेलं आहे. तर दुसरीकडे मोदी अर्थमंत्री जेटलींवर नाराज असल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

काय आहे पीएनबी घोटाळा?
देशातील सर्वात मोठी दुसरी बँक पंजाब नॅशनल बँकेत साडे अकरा हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी सीबीआय चौकशी सुरु आहे. नीरव मोदी आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांनी आपल्या तीन कंपन्यांद्वारे षडयंत्र रचलं. तीन कंपन्यांच्या नावावर हाँगकाँगमधून सामान येणार असल्याचं सांगितलं. सामान मागवण्यासाठी लेटर ऑफ अंडरटेकिंगची मागणी बँकेकडे केली. हेच पत्र हाँगकाँगमधल्या अलाहाबाद आणि अॅक्सिस बँकेच्या नावावर काढण्याची मागणी केली. याद्वारे हाँगकाँगहून २८० कोटी रुपयांचं सामान मागवण्यात आलं. लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे जे सामान मागवण्यात येत आहे, त्याचे पैसे देण्याची जबाबदारी बँक घेत आहे. पीएनबीने हाँगकाँगमधील अलाहाबाद बँकेला ५ आणि अॅक्सिस बँकेला ३ लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी केले आणि जवळपास २८० कोटी रुपयांचं सामान आणण्यात आलं. १८ जानेवारीला या तिन्ही कंपन्यांचे संबंधित अधिकारी पीएनबीच्या मुंबई शाखेत गेले आणि सामानाचे पैसे भरण्यास सांगितलं.
मात्र बँक अधिकाऱ्यांनी जेवढे पैसे परदेशात पाठवायचे आहेत, तेवढी कॅश भरायला सांगितली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बँकेचं लेटर दाखवलं आणि पेमेंटची मागणी केली. मात्र बँकेने जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यांची झोपच उडाली. कारण बँकेत एक रुपयाही न ठेवता या कंपन्यांनी लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी करायला लावल्याचं उघड झालं.
बँकेने तक्रार दाखल केली असून हे प्रकरण आता सीबीआयपर्यंत पोहोचलं आहे. नीरव मोदीला जारी केलेले आठही लेटर ऑफ अंडरटेकिंग बनावट असल्याचं उघड झालं. पीएनबीचे डेप्युटी मॅनेजर गोकुळनाथ शेट्टीने एका कर्मचाऱ्याला हाताशी घेऊन हे लेटर जारी केल्याची माहिती आहे. त्यामुळे आता २८० कोटी रुपये पीएनबीला चुकते करावे लागणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments