Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeदेशपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चामडी सोलून काढू- तेज प्रताप यादव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चामडी सोलून काढू- तेज प्रताप यादव

पाटणा – राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष व बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या सुरक्षेत केंद्र सरकारने कपात केली आहे. सरकारने लालू यांची सुरक्षा झेड प्लस (Z+) वरून झेड (Z) केली असून त्यांना देण्यात आलेले एनएसजी कमांडोंचे सुरक्षा कवच काढून घेण्यात आले आहे. यावर रागाच्या भरात लालू यांचे पुत्र तसेच बिहारचे माजी आरोग्य मंत्री तेज प्रताप यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. 

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्या मुलाच्या लग्नात तोडफोड करण्याची धमकी दिल्यानंतर आता तेज प्रताप यादव यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चामडी सोलून काढू, असं वादग्रस्त विधान तेज प्रताप यादव यांनी केले आहे.

दरम्यान, यापूर्वी तेज प्रताप यादव यांनी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली होती. तेज प्रताप यादव म्हणाले होते की, ‘मला सुशील मोदी यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी निमंत्रण दिलं आहे. जर मी तिथे गेलो तर तिथेच त्यांची पोलखोल करणार’.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments