Friday, March 29, 2024
Homeदेशसमिक्षा बैठकीसाठी राहुल गांधी आज अहमदाबादमध्ये

समिक्षा बैठकीसाठी राहुल गांधी आज अहमदाबादमध्ये

नवी दिल्ली – गुजरात विधानसभा निवडणूकीत भाजपला काँटे की टक्कर देत काँग्रेस गुजरातमध्ये दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला. या संपुर्ण निवडणूकीमध्ये काँग्रेसच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अहमदाबादमध्ये दाखल होणार आहे. काँग्रेसच्या या तीन दिवसीय आढावा बैठकित काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते सहभाग घेण्याची शक्यता आहे.

गुजरात विधानसभा निवडणूकीतील काँग्रेसच्या कामगिरीचा आढावा या बैठकीत घेतला जाण्याचा अंदाज आहे. गेल्या २२ वर्षांपासुन गुजरातमध्ये सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेसने या निवडणूकीत चांगली कामगिरी करत ८० जागांपर्यंत मजल मारली. गुजरात निवडणूक प्रचारादरम्यान राज्यभर सभा आणि रॅलीद्वारे राहुल गांधी यांनी झंझावती प्रचार केला होता. या दरम्यान राहुल यांनी गुजरातमधील मंदिरांना दिलेल्या भेटी चर्चेच्या तसेच विवादाचा विषय ठरल्या होत्या. या निवडणूकीत पक्षाने केलेल्या चुकांची समिक्षा राहुल या बैठकित करणार आहेत. तसेच पक्षाच्या कामगिरीत सुधारणा करण्याबाबची रणनिती देखील आखली जाण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments