Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशगुजराती भगिनी सुरक्षित आहेत का ?- राहुल गांधी

गुजराती भगिनी सुरक्षित आहेत का ?- राहुल गांधी

Rahul Gandhi, Narendra Modi, Rahul Gandhi vs Narendra Modi in Gujarat, Gujarat Polls

अहमदाबाद: काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाजपशासित गुजरातमध्ये महिलांच्या सुरक्षेच्या समस्येवरून आपला पाचवा प्रश्न विचारला आहे. त्यांनी रविवार त्यांच्या ट्विटर हँडलवरून २२ वर्षांचा हिशोब, गुजरात मागतोय उत्तर या शीर्षकाखाली पाचवा प्रश्न विचारला आहे.

राहुल गांधीनी मोदींना पाचव्या प्रश्नामध्ये, महिलांना सुरक्षा, शिक्षण, पोषण हे काहीच न मिळता फक्त महिलांचे शोषण करण्यात आले असल्याचे म्हटले आहे. अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यासंह सर्व महिलांची केवळ निराशा केली आहे. गुजरातच्या बहिणींना दिलेल्या आश्वासनांच्या पुर्ततेचं काय ? असा सवाल त्यांनी केला आहे.

सुरक्षाविषयक समस्यामध्ये राहुल गांधी यांनी महिलांवर झालेल्या अत्याचाराला न्याय कधी मिळणार आहे. आज देशामध्ये गुजरातचा महिला तस्करीमध्ये ३ रा , अॅसिड हल्ल्यात ५ वा आणि लैगिंक अत्याचारामध्ये १० क्रमांक का लागतो. तसेच सुरत व अहमदाबाद ही शहरे महिलांविषयक गुन्हेगारीत पहिल्या १० मध्ये का आली, असा सवाल करत गुजरातमध्ये महिला सुरक्षित नसल्याचे आपल्या प्रश्नामधून निदर्शनास आणले आहे. याच प्रमाणे मुलींच्या शिक्षणात गुजरात का मागे आहे. महिला साक्षरतेमध्ये सातत्याने का घसरण झाली, असा सवालही राहुल गांधीं यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments