Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeदेशकाँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधींची बिनविरोध निवड

काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधींची बिनविरोध निवड

नवी दिल्ली: काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून राहुल गांधींची निवड झाली आहे. तब्बल १९ वर्षांनंतर काँग्रेसला नवे अध्यक्ष मिळाले आहेत. तसंच गांधीनेहरु कुटुंबातील काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी पाचवे सदस्य आहेत.

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची आज काँग्रेसच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी एम. रामचंद्रन यांनी काँग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. घोषणा होण्याच्या आधीपासूनच काँग्रेस मुख्यालयाबाहेर जल्लोषाला सुरवात झाली होती. गुजरातमधल्या विधानसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला दोन दिवस राहिले असताना ही घोषणा झाल्यानं काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या इतिहासात सोनिया गांधींनी सर्वाधिक काळ म्हणजे तब्बल १९ वर्ष अध्यपद भूषवलं. २०१३ पासून राहुल उपाध्यक्षपदी होते. गुजरातमध्ये सध्या प्रचार शिगेला पोहोचलाय आणि राहुल हे प्रचारात व्यस्त आहेत. १६ तारखेला ते अध्यक्षपदाचा औपचारिक पदभार स्विकारतील. राहुल हे काँग्रेसचे सर्वात तरूण अध्यक्ष आहेत.

दिवाळीनंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यासाठी फक्त राहुल गांधी यांनीच अर्ज भरला होता. त्यामुळे राहुल गांधी हेच अध्यक्ष होणार हे निश्चित होतं. १९ डिसेंबरला ते अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारतील अशी शक्यता वर्तवली जात होती.  पण आता ते १६ डिसेंबरला पदभार स्वीकारतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे. ८९ जणांनी राहुल गांधींचं अध्यक्षपदासाठी  नाव सुचवलं  होतं. राहुल गांधी काँग्रेसचे नववे अध्यक्ष होणार आहेत. अत्यंत नि:पक्षपातीपणे ही प्रक्रिया पार पडली आहे.

काँग्रेसची सध्या ५ राज्यात आणि एका केंद्रशासित प्रदेशात सत्ता  आहे. कर्नाटक आणि पंजाब ही मोठी राज्ये काँग्रेसकडे आहेत. मात्र कर्नाटकात ६ महिन्यानंतर निवडणुका आहे. गुजरात निवडणुकीचे निकालही जवळ आले आहेत. त्यामुळे या साऱ्या परिस्थितीत आता हा निकाल काँग्रेसला मदत करतो की तोट्याचा ठरतो आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments