Friday, March 29, 2024
Homeदेशकाँग्रेसने मनरेगाला जेवढा पैसा दिला, तेवढाच पैसा मोदिंनी टाटाला दिला- राहुल गांधी

काँग्रेसने मनरेगाला जेवढा पैसा दिला, तेवढाच पैसा मोदिंनी टाटाला दिला- राहुल गांधी

पोरबंदर – काँग्रेस मनरेगाला ३३ हजार कोटी रुपये दिले. मनरेगाने गोरगरिबांना रोजगार मिळाला. नरेंद्र मोदींनी एवढाच पैसा टाटा नॅनोला दिला परंतु नॅनो मला दिसत नाही असा प्रश्न काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

राहुल गांधी आज पोरबंदर येथील जणतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी येथील जणतेला काँग्रेसला सत्ता मिळाली तर मच्छिमारांच्या विकासाराठी स्वतंत्र्य मंत्रालय तयार करू, असे आश्वासन दिले आहे. एवढेच नाही तर त्यांनी मच्छीमारी करणाऱ्या समाजाला सर्वतोपरी मदत करण्याचेही आश्वासन दिले आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत विजयी होण्यासठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. पोरबंदर येथे त्यांनी क्रिती मंदिरालाही भेट दिली. येथे माच्छीमार अधिकार सभेच्या सदस्यांनीत्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्या पुढे मच्छीमारांनी त्यांच्या समस्यांचा पाढा वाचला.
राहुल यांनी यावेळी येथील समुदायाला तुम्हाला नॅनो दिसली का असा प्रश्नही विचारला. टाटांना नॅनो कार तयार करण्यासाठी मोदींनी तब्बल ३३ हजार कोटी रुपये दिले आहेत. जेवढा पैसा काँग्रेसने मनरेगाला .जेवढा पैसा दिला. तेवढाच पैसा मोदिंनी टाटाला दिला आहे, असेही राहुल म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments