Friday, March 29, 2024
Homeदेशराहुल चा शहा प्रकरणावरून सरकारला टोला

राहुल चा शहा प्रकरणावरून सरकारला टोला

दिल्ली: काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय झाल्याचे दिसत आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांचा मुलगा जय विरोधात वृत्त देणाऱ्या ‘वायर’ या संकेतस्थळाविरोधात सरकारकडून कायदेशीर मदत देण्यावरून त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. शहा-जादाला सरकारी कायदेशीर मदत! ‘व्हाय दिस, कोलावरी दा?’, असे ट्विट करत केंद्र सरकार व भाजपला टोला लगावला आहे.

राहुल यांनी या ट्विटच्या माध्यमातून जय शहाचा मुद्या पुन्हा एकदा उपस्थित करत भाजपवरील आपला राग दाखवून दिला. या ट्विटबरोबर त्यांनी ‘द वायर’च्या संकेतस्थळाकडून जारी करण्यात आलेले निवेदनही जोडले आहे. ‘जय अमित शहाचा ‘द वायर’चे तोंड बंद करण्याचा प्रयत्न’, असे त्याचे शीर्षक आहे. विशेष म्हणजे भाजपने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांचे शस्त्रास्त्राचा व्यापारी संजय भंडारी याच्याबरोबर संबंध असल्याचा मंगळवारी आरोप केला. त्याचदिवशी राहुल गांधी हेही आक्रमक होत भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपने याप्रकरणी काँग्रेसला स्पष्टीकरण मागितले आहे.

काँग्रेसने यापूर्वीच जय शहा यांचा व्यवसाय एका वर्षांत ५० हजार रूपयांवरून ८० कोटीपर्यंत कसा गेला असा सवाल विचारला आहे. या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मौन का?, त्यांनी यावर बोलावे अशी मागणी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत या प्रकरणी चौकशी करावी, असेही काँग्रेसने म्हटले आहे. भाजपने आरोप फेटाळत जय शहा यांचा व्यवसाय वैध असल्याचे म्हटले आहे. भाजप भांडवलवादाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला.

दरम्यान, व्हाय धीस कोलावरी डी हे तामिळ चित्रपट ‘थ्री’ मधील गाणं असून तामिळ आणि इंग्रजीत असून अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ते लिहिलं तर धनुषने गायलं आहे. हे गाणं कमालीचं लोकप्रिय झालं होतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments