Thursday, April 18, 2024
Homeदेशमोदींनी विकासाऐवजी धार्मिक तणावच वाढवला - राहुल गांधी

मोदींनी विकासाऐवजी धार्मिक तणावच वाढवला – राहुल गांधी

बेंगळुरू – राहुल गांधींनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत धार्मिक, जातीय हिंसाचाराचा मुद्दा उचलला आहे. मंगळवारी शिवमोगामध्ये जन आशिर्वाद यात्रेत बोलताना राहुल म्हणाले, अमेरिकेला फक्त भारत आणि चीन आव्हगान देऊ शकत होते. पण मोदींनी आपल्या देशाची शक्तीच ओळखली नाही. ते देशात धार्मिक तणावाचे वातावरण पसरवत आहेत. राहुल मंगळवारपासून दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर असून ठिकठिकाणी त्यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

मोदींच्या दोन्ही बाजुला बसतात भ्रष्ट नेते
राहुल गांधी म्हणाले की, नरेंद्र मोदी भ्रष्टाचारावर तासनतास बोलतात. पण त्यांच्या दोन्ही बाजुला भ्रष्टाचारीच नेते बसलेले असतात.
त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला की, अमित शहांच्या मुलाची कंपनी ५० हजाराहून ८० कोटींपर्यंत कशी पोहोचली. विजय माल्या, नीरव मोदी आणि ललित मोदी यांना देशातून कोणी पळून जाऊ दिले?

पेपर लीक ही सरकारने दिलेली भेट
राहुल गांधींनी आरोप लावला की, सरकार विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहे. सीबीएसई आणि एसएससी चे पेपर लीक होतात. निवडणुकीच्या तारखा लीक होतात. ही सर्व परिस्थिती म्हणजे सरकारची भेट आहे.

दोन दिवसात असा आहे दौरा….
मंगळवारी :राहुल गांधींनी सर्वात आधी शिवमोगामध्ये सभा घेतली. हा भाग भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बीएस येडियुरप्पा यांचा बालेकिल्ला असल्याचे समजले जाते. दावनगिरीमधील जिहोन्नाली, हरिहारा आणि बाथीमध्येही त्यांच्या प्रचारसभा आहेत.
बुधवार : चित्रादुर्गा जिल्ह्याच्या होलालाकेरे, तुमाकुरु आणि रामनगरमध्ये त्यांच्या सभा असतील. त्यानंतर ते सिद्धगंगा मठात शिवकुमार स्वामी यांची भेट घेतील. ते १११ वर्षांचे झाले आहेत. शनिवारीच स्वामीजींचा वाढदिवस होता. २६-२७ मार्चला अमित शहादेखिल या मठात आले होते.

दोन महिन्यात राहुल गांधींचा पाचवा दौरा….
राहुल गांधींनी आतापर्यंत चार वेळा राज्यांचा दौरा केला आहे. यादरम्यान त्यांनी १५ मंदिरांचे दर्शन केले. ते याठिताणी सॉफ्ट हिंदुत्वासह इतर धर्मांवरही लक्ष केंद्रीत करत आहेत. त्यामुळे ते दर्गा आणि चर्चमध्येही जात आहेत.

अमित शहांचा दौरा रद्द
अमित शहादेखिल मंगळवारी याठिकाणी यणार होते. पण देशभरात सुरू असलेल्या दलित आंदोलनामुळे त्यांना दौरा रद्द करावा लागला होता.

फक्त चार राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता:

कर्नाटक, पंजाब, मिझोरम आणि पद्दुचेरी (केंद्र शासीत) याठिकाणी काँग्रेसची सत्ता आहे. त्यात कर्नाटक लोकसंख्या आणि क्षेत्रफळाचा विचार करता सर्वात मोठे आहगे. त्यामुळे काँग्रेसला याठिकाणी सत्ता वाचवणे अत्यंत गरजेचे आहे.

कर्नाटकनंतर तीन राज्यांत निवडणुका:

कर्नाटकनंतर मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांत निवडणुका आहेत. त्यामुळे कर्नाटकात राहुल गांधींना सत्ता वाचवता आली तर त्याचा फायदा त्यांना इतर राज्यांतही मिळेल. २०१९ लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही कर्नाटकची निवडणूक महत्त्वाची आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments