होम देश रमेशकुमार विधानसभाध्यक्षपदी निवड, काँग्रेस-जेडीएसचा बहुमत चाचणीआधी विजय

रमेशकुमार विधानसभाध्यक्षपदी निवड, काँग्रेस-जेडीएसचा बहुमत चाचणीआधी विजय

20
0
शेयर

बंगळुरू: कर्नाटक निवडणुकीनंतर भाजपच्या येदियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना आपले बहुमत सिध्द करता आले नाही, नंतर त्यानां राजीनामा द्यावा लागला. कर्नाटकात शुक्रवारी काँग्रेस-जेडीएस सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. काँग्रेस आमदार रमेश कुमार यांची विधानसभाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्याविरोधात अर्ज दाखल केलेले भाजप आमदार एस. सुरेशकुमार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. विधानसभाध्यक्षपदाचा सन्मान कायम राहावा यासाठी भाजप निवडणुकीतून माघार घेत असल्याचे भाजप नेते बी.एस. येदियुरप्पा यांनी म्हटले आहे.

११७ आमदारांच्या पाठिंब्याचा दावा करत असलेल्या आघाडीने काँग्रेसचे रमेशकुमार यांना उमेदवारी दिली होती. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी बहुमत चाचणीत बहुमत सिद्ध करण्याआधी आपले सामर्थ्य आजमावण्यासाठी भाजपने उमेदवार उतरवला असल्याचे म्हटले जात होते, परंतू भाजपने शुक्रवारी दुपारी अर्ज मागे घेतला.

गुरुवारपर्यंत काँग्रेस-जेडीएस आमदार हॉटेलमध्येच बंद होते. १५ मे रोजी निकाल लागल्यापासून ९ दिवस दोन्ही पक्षांनी आपल्या आमदारांना हॉटेल व रिसॉर्टमध्येच ठेवले आहे.

विधानसभाध्यक्ष निवडणुकीनंतर बहुमत चाचणी
बहुमतासाठी आवश्यक आकडे – १११
काँग्रेस (७८-१ स्पीकर)+जेडीएस (३८-१)=११४
भाजप = १०४