हिसारमध्ये पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार आणि हत्या

- Advertisement -

हिसारहरयाणामध्ये  पाच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करुन अमानुषपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हरयाणातील हिसारच्या उकलाना गावात ही घटना घडली आहे. चिमुकलीवर केलेले अमानुष अत्याचार पाहून पाच वर्षांपूर्वी राजधानी दिल्लीमध्ये घडलेल्या निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणाची आठवण होते.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगामध्ये लाकडी काठी घुसवून अमानुषपणे तिची हत्या करण्यात आली आहे. मुलीच्या घरापासून काही मीटर अंतरावर तिचा मृतदेह आढळून आला आहे.

या घटनेनंतर संतप्त जमावाने परिसरातील दुकाने बंद पाडली. या घटनेच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली असून, एफआयआर दाखल करण्यात आली असल्याची माहिती हिसारचे  पोलीस उपअधीक्षक जितेंद्रकुमार यांनी दिली.

- Advertisement -
- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here