Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशही तर मॅच फिक्सिंगच, चंद्राबाबुंच्या राजीनामास्त्रावर रेणुका चौधरींची टीका

ही तर मॅच फिक्सिंगच, चंद्राबाबुंच्या राजीनामास्त्रावर रेणुका चौधरींची टीका

Chandrababu Naidu-Renuka Chaudharyमहत्वाचे….
१. तेलुगू देशमच्या भूमिकेवरुन स्वागत आणि टीका
२. दोन मंत्र्यांनी राजीनामा दिला तर काय होईल
३. जेव्हा केंद्र सरकार कमजोर असते किंवा त्यांच्याकडून असा इशारा केला जातो तेव्हाच असे कृत्य केले जाते


नवी दिल्ली: तेलुगू देशम पक्षाने (टीडीपी) राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे काही राजकीय पक्षांनी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या निर्णयाचे स्वागत केले. काही पक्षांनी ही राजकीय खेळी असल्याचे सांगत टीका केली. काँग्रेसच्या नेत्या रेणुका चौधरी यांनी तर याला ‘मॅच फिक्सिंग’ची उपमा दिली. कसलं संकट ? हे तर मॅच फिक्सिंगसारखं आहे. ते अजूनही आघाडीतून बाहेर पडण्याची भाषा बोलत आहेत.

बुधवारी रात्री चंद्राबाबू नायडू यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त करत टीडीपीचे दोन मंत्री राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी करूनही केंद्राकडून दुर्लक्ष होत असल्याची टीका करत पंतप्रधानानी आपला फोनही उचलला नसल्याची खंत व्यक्त केली होती. रेणुका चौधरी यांनी यावरही टीका केली.

कसलं संकट, असा सवाल करत हे मॅच फिक्सिंग सारखे असल्याचे त्या म्हणाल्या. दोन मंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे काय होणार आहे. तुम्ही जर गंभीर असाल तर गंभीरपणेच वागा, असा सल्लाही त्यांनी दिला.

‘पंतप्रधान मोदींनी चंद्राबाबू नायडूंचा फोन न उचलणे दुर्दैवी’

देशात गेल्या दोन दिवसांपासून विविध ठिकाणी महापुरूषांच्या पुतळ्यांची तोडफोड सुरू आहे. याप्रकरणीही चौधरी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. हा वेडेपणा कुठे थांबणार नाही. जेव्हा केंद्र सरकार कमजोर असते किंवा त्यांच्याकडून असा इशारा केला जातो तेव्हाच असे कृत्य केले जाते. केंद्र सरकारला हे मान्य करावे लागेल की एकतर अपयशी ठरलेत किंवा जाणूनबुजून असे करत आहेत. ‘अक्लमंद के लिए इशारा काफी है,’ असे म्हणत त्यांनी भाजपाला टोलाही लगावला.

तत्पूर्वी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी याप्रकरणी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. एखाद्या महत्वपूर्ण विषयासाठी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केलेला फोन पंतप्रधान मोदींनी उचलला नाही, हे खूप दुर्देवी आहे. पंतप्रधानांची ही भूमिका आंध्र प्रदेशच्या जनतेसाठी योग्य नसल्याचे म्हणत पंतप्रधान मोदींवर पटेल यांनी म्हटले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments