Friday, March 29, 2024
Homeदेशओवेसींसह सोनिया गांधी, रविश कुमार यांच्यावर गुन्हे नोंदवा

ओवेसींसह सोनिया गांधी, रविश कुमार यांच्यावर गुन्हे नोंदवा

Owaisi - Sonia Gandhi, ravish kumar, caa, nrcनवी दिल्ली :  देशभरात नागरिकत्व संशोधन कायद्याला विरोध सुरु असतांना नवीन वाद जन्माला आला आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी, एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी, पत्रकार रविश कुमार यांच्यासह इतर काहीजण नागरिकत्व संशोधन कायद्याबद्दल चुकीची माहिती पसरवत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी राष्ट्रीय हिंदू वाहिनीने केली आहे.

अखंड भारतचे राष्ट्रीय सचिव अॅड. प्रवीण गुप्ता यांनी एका याचिकेतून ही मागणी केली आहे. याप्रकरणी २४ जानेवारी रोजी कोर्टात सुनावणी होणार आहे. पेशाने वकील असलेले प्रवीण गुप्ता यांनी ही याचिका मुख्य न्याय दंडाधिकारी कोर्टात (एसीजेएम) दाखल केली आहे. याचिकेत म्हटले आहे की केंद्र सरकारने नागरिकत्व संशोधन कायदा मंजूर करून तो देशभरात लागू केला आहे. परंतु, या कायद्याला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टात यावर सुनावणी होणे अद्याप बाकी आहे. मात्र, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, प्रियांका गांधी, खासदार ओवेसी, पत्रकार रविश कुमार यांच्यासह २० ते २५ लोकांनी या कायद्याविषयी चुकीची माहिती पसरवली आहे. तसेच लोकांना भडकावण्याचे काम केले आहे, असे या याचिकेत म्हटले आहे. देशात उसळलेल्या हिंसाचाराला ही सर्व मंडळी जबाबदार आहे, त्यामुळे या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी गुप्ता यांनी केली आहे.

चुकीची माहिती पसरवण्यात आल्याने या कायद्याची खरी माहिती लोकांपर्यंत पोहोचली नाही. काही लोकांचे राष्ट्रीयत्व संपणार असल्याची चुकीची माहिती पसरवण्यात आली आहे. या सर्व आरोपींनी जाणीवपूर्वक रणनीती आखून भडकावू विधान केले आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा खराब झाली आहे. तसेच लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. मीडियात या लोकांचे वक्तव्य आल्यानंतर लोकांनी सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणे सुरू केले. याची सुरुवात जामिया येथून सुरू झाल्याचे या याचिकेत म्हटले आहे.

हल्ला केल्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केला. परवानगी असून जामियाच्या प्राध्यापकांनी चुकीचे वक्तव्य केले. पोलिसांना कॅम्पसमध्ये घुसण्याची परवानगी दिली नव्हती, अशी चुकीची माहिती त्यांनी दिली. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात असंतोष उफाळला. यात काही चॅनेलने चुकीची माहिती दिली. या घटनेला जबाबदार असणाऱ्या सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments