आरएसएस कार्यकर्त्याची हत्या

- Advertisement -

लुधियाना: पंजाबमधील लुधियाना शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याची त्यांच्या घराबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. रवींद्र गोसाई (६०) असे त्या कार्यकर्त्याचे नाव असून मंगळवारी सकाळी संघाच्या शाखेतून परत येत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. या हल्ल्यात गोसाई जागीच ठार झाले.

गोसाई यांच्या घराबाहेरील सीसीटीव्हीत त्यांच्या हत्येची घटना कैद झाली आहे. दोन बुरखाधारी व्यक्ती मंगळवारी सकाळी ६.३० वाजल्यापासून त्यांच्या घराबाहेर दुचाकीवरुन फिरताना दिसत आहेत . ८.३० च्या सुमारास गोसाई शाखेतून परत येत असताना दुचाकीवरील त्या दोघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या असे लुधियानाचे पोलिस आयुक्त आर.एम धोके यांनी सांगितले. रवींद्र गोसाई हे गेल्या अनेक वर्षांपासून संघात कार्यरत होते. संघाच्या लुधियाना शहरातील शाखेचे प्रमुख होते.

- Advertisement -
- Advertisement -