Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeदेशफुलराणी सायना नेहवालने हातात घेतले कमळ!

फुलराणी सायना नेहवालने हातात घेतले कमळ!

Saina Nehwal Joins BJP with sisterनवी दिल्ली : बॅडमिंटनपटू सायना नेहवाल फुलराणी म्हणून ओळखली जाते. सायनाने आज बुधवार (२९ जानेवारी) भाजपात प्रवेश केला आहे. प्रवेशादरम्यान सायनाने माझ्यासाठी आज आनंदाचा दिवस असल्याचे सांगितले.

दिल्ली विधानसभेसाठी मतदान अकरा दिवसांवर येऊन ठेपलेलं असताना सायनाने भाजपात प्रवेश केला. यावेळी तिची बहीण अबु चन्द्रांशु नेहवाल हिनेही भाजपात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रीय सचिव अरुण सिंग व इतर ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. सायना नेहवालचा जन्म हरियाणाचा असून भारतातील यशस्वी खेळाडूंच्या यादीत तिचा समावेश आहेत. सायनाने ऑलिम्पिक आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये पदकाची कमाई केली आहे. २०१५ मध्ये सायना नेहवाल जागतिक रॅकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर येणारी पहिली भारतीय बॅडमिंटन खेळाडू ठरली होती. सध्या ती नवव्या क्रमांकावर आहे.

बॅडमिंटनमध्ये भारताची मान उंचावणारी सायना नेहवाल आज आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. भाजपा कार्यालयात प्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यावेळी उपस्थित असणार आहेत. सायना नेहवालच्या आधी अनेक खेळाडूंनी भाजपात प्रवेश केला आहे. पैलवान योगेश्वर दत्त आणि बबिता फोगाट यांनीदेखील भाजपात प्रवेश केला आहे.

२३ मे २०१५ रोजी पटकावला अव्वल क्रमांक

१९ मार्च १९९० रोजी हरियाणामधील हिसार येथे सायनाचा जन्म झाला. २३ मे २०१५ रोजी सायनाने भारताची मान उंचावत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांक पटकावला होता. हे यश मिळवणारी सायना नेहवाल पहिली भारतीय महिला बॅडमिंटन खेळाडू आहे. २०१२ मध्ये सायनाने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवलं होतं. बॅडमिंटनमध्ये पदकाची कमाई करणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली होती.

सायना नेहवालवर बायोपिक….

सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित चित्रपटही येणार आहे. अमोल गुप्ते या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून फेब्रुवारीत शुटिंग पूर्ण होणार आहे. परिणीती चोप्रा चित्रपटात सायनाची भूमिका निभावताना दिसणार आहे. या चित्रपटासाठी आधी श्रद्धा कपूरचं नाव चर्चेत होतं. पण नंतर परिणीतीचं नाव अंतिम करण्यात आलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments