Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeदेशकठुआ हत्याकांड : निष्पक्ष सुनावणीत आम्हाला रस, तुमच्या आंदोलनात नाही

कठुआ हत्याकांड : निष्पक्ष सुनावणीत आम्हाला रस, तुमच्या आंदोलनात नाही

supreme court,महत्वाचे…
१. तुमच्याजवळ प्रॅक्टिसचा अधिकार आहे, सुनावणी रोखण्याचा नाही. तुमचे आंदोलन संपले की नाही? न्यायालयाने वकिलांना फटकारले
२. वकिलांनी गुन्हे शाखेच्या पोलिसांना सामुहिक बलात्कार प्रकरणी ७ आरोपींविरोधात ओरापपत्र दाखल करण्यापासून रोखले होते
३. २६ एप्रिल रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होईल असे न्यायालयाने स्पष्ट केले


पुणे: कठुआ सामुहिक बलात्कार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी पुन्हा जम्मू-काश्मीरच्या वकिलांना फटकारले. ‘तुमच्याजवळ प्रॅक्टिसचा अधिकार आहे, सुनावणी रोखण्याचा नाही. अद्याप तुमचे आंदोलन संपले की नाही? अशा शब्दांत न्यायालयाने वकिलांना फटकारले. तसेच निष्पक्ष सुनावणीत आम्हाला रस, तुमच्या आंदोलनात नाही’ असे न्यायालयाने त्यांना सुनावले. दरम्यान, १२ एप्रिललाच आंदोलन मागे घेतल्याचे या वकिलांनी कोर्टाला सांगितले. त्यानंतर २६ एप्रिल रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होईल असे न्यायालयाने स्पष्ट केले.

जम्मू-काश्मीरचे वकिल सर्वोच्च न्यायालय हे सांगण्याचा प्रयत्न करीत होते की, माध्यमांनी त्यांना चुकीच्या पद्धतीने दाखवले. आम्ही आंदोलन इतर कारणांसाठी होते. मात्र, ते बलात्काराच्या प्रकरणाविरोधात असल्याचे दाखवले गेल्याचे या वकिलांनी म्हटले आहे. यावर टिप्पणी करताना सरन्यायाधीश दिपक मिश्रा म्हणाले, आंदोलनाची पार्श्वभूमी काहीही असो मात्र, त्याचा परिणाम चुकीचा झाला. आम्हाला केवळ निष्पक्ष सुनावणीची चिंता आहे.

जम्मू-काश्मीरच्या न्यायालयात वकिलांच्या आंदोलनामुळे कामकाज ठप्प झाले होते. त्यामुळे पोलिसांना कठुआ बलात्कार प्रकरणाचे आरोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायाधिशांच्या घरी जावे लागले होते, याची आठवण आज सर्वोच्च न्यायालयाने करुन दिली.

कठुआमध्ये ८ वर्षांच्या चिमुकलीवर सामुहिक बलात्कारानंतर तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात स्वतः सर्वोच्च न्यायालयाने लक्ष घातले होते. दरम्यान, आरोपींवर आरोपपत्र दाखल करु नये यासाठी जम्मू-काश्मीरच्या वकिलांनी काम बंद आंदोलन पुकारले होते. यावर कोणीही पीडित किंवा आरोपीचे वकिलपत्र घेण्यापासून रोखू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी यासंदर्भात बार काऊंसिल ऑफ इंडिया आणि जम्मू-काश्मीर सर्वोच्च न्यायालयाने उत्तर देण्यास सांगितले होते.

जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील एका विशिष्ट समाजाच्या वकिलांनी गुन्हे शाखेच्या पोलिसांना ८ वर्षांच्या मुलीवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणी ७ आरोपींविरोधात ओरापपत्र दाखल करण्यापासून रोखले होते. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या डीएनए, न्यायवैद्यक चाचणी आणि शवविच्छेदन अहवालानुसार, हत्येपूर्वी त्या चिमुकलीला एका मंदिरात अनेक दिवस बंदी ठेवून तिला नशेची औषधे देऊन अनेक दिवस सामुहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिची रासणा गावांत हत्या करण्यात आली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments