Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशसीरम, भारत बायोटेकच्या लसींना इमर्जन्सी वापराची परवानगी नाही, 'हे' आहे कारण...

सीरम, भारत बायोटेकच्या लसींना इमर्जन्सी वापराची परवानगी नाही, ‘हे’ आहे कारण…

नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लसीचा आपातकालीन वापर करण्याची परवानगी मिळावी, यासाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि हैदराबादच्या भारत बायोटेकने  प्रस्ताव पाठवले होते. पण हे प्रस्ताव मंजूर होऊ शकले नाहीत. लसीची सुरक्षितता आणि प्रभावीपणाबद्दल पुरेशी माहिती दिलेली नसल्यामुळे हे प्रस्ताव मंजूर झाले नाहीत. अशी माहिती समोर आली आहे.

“लसीची सुरक्षितता आणि परिणामकारकतेबद्दल पुरेसा डाटा दिलेला नाही, त्यामुळे दोन्ही कंपन्यांचे प्रस्ताव मंजूर होऊ शकले नाहीत. त्यांना अजून डाटा सादर करायला सांगितला आहे” असे सूत्रांनी एनडीटीव्हीला सांगितले.

CDSCO च्या समितीने फायझर, सीरम आणि भारत बायोटेकच्या अर्जाचा आढावा घेतला. “अनेक बैठका ही एक ठरलेली स्टँडर्ड प्रॅक्टीस आहे. एक ते दोन आठवडे ही प्रक्रिया चालेल” असे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधील सूत्राने सांगितले. करोना व्हायरसवर मात करण्यासाठी लस अखेर दृष्टीपथात आली आहे.

आतापर्यंत जगभरात सहाकोटी पेक्षा जास्त नागरिकांना या व्हायरसची लागण झाली आहे. पंधरा लाखापेक्षा जास्त नागरिकांनी या व्हायरसमुळे आपले प्राण गमावले आहेत.

सध्यातरी लस हाच या आजाराला रोखण्यााच एकमेव मार्ग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील काल एका कार्यक्रमात बोलताना देशवासियांना आता लसीची जास्त काळ प्रतिक्षा करावी लागणार नाही, असे सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments