अल्पवयीन तरुणांना मारहाण करुन एकमेकांसोबत करायला लावला सेक्स!

- Advertisement -

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत १० जणांनी मिळून दोन अल्पवयीन तरुणांवर अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरुणांना आधी जबरदस्त मारहाण करण्यात आली. यानंतर त्यांना एकमेकांसोबत अनैसर्गिक कृत्य करण्यात भाग पाडण्यात आलं. यावेळी आरोपी हे सर्व आपल्या मोबाइलमध्ये शूट करत होते. पश्चिम दिल्लीत हा धक्कादायक प्रकार घडला असून, पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. 

घटना उघड झाल्यानंतर पोलिसांनी १० जणांवर गुन्हा दाखल केला. अनैसर्गिक कृत्यासोबत पॉस्कोअंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. शनिवारी रात्री दोन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती दिल्लीचे पोलिसांचे विशेष आयुक्त आणि मुख्य जनसंपर्क अधिकारी दिपेंद्र पाठक यांनी दिली आहे.

२६ ऑक्टोबर रोजी पश्चिम दिल्ली येथील रोहिनी येथे हा प्रकार घडला होता. पण घाबरलेल्या मुलांनी भीतीपोटी या घटनेबद्दल कोणालाच सांगितलं नव्हतं. आरोपींनी शूट केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पीडित मुलांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती मिळाली. यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पीडित मुलांचं वय १३ आणि १५ आहे. दोघेही मित्र असून आपल्या कुटुंबासोबत मेट्रो विहार परिसरात राहतात’. आरोपींपैकी एक असणा-या कन्वर सिंह याला आपल्या घरात झालेल्या चोरीत पीडित मुलांचा समावेश असल्याचा संशय होता. यामुळेच त्याने मुलांना धमकी देत भेटण्यासाठी बोलावलं आणि ओलीस ठेवलं. सुरुवातीला कन्वर सिंह याने चामड्याच्या पट्ट्याने मारहाण केली. पण मुलांनी चोरी केल्याचा गुन्हा कबूल केला नाही तेव्हा तो संतापला आणि आपल्या मित्रांना बोलावलं. त्यांनी पीडित मुलांना नग्न केलं आणि एकमेकांसोबत अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडलं. तब्बल पाच तास हा अमानुष छळ सुरु होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisement -

‘दोघा पीडित मुलांना एकमेकांसोबत अनैसर्गिक कृत्य करायला लावून, आरोपींनी मोबाइलमध्ये शूट केलं. पोलिसांकडे जाऊन घटनेची भाष्यता केल्यास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करु अशी धमकीच आरोपींनी दिली होती’, असं पोलिसांनी सांगितलं आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींनी मुलांच्या गुप्तांगाला सिगारेटचे चटकेही दिलेत. दोन्ही मुलांवर रुग्णालयात उपचार सुरु असून, प्रकृती नाजूक आहे.

- Advertisement -