Placeholder canvas
Thursday, April 18, 2024
Homeदेशउन्नाव बलात्कार प्रकरणाची एसआयटी चौकशी

उन्नाव बलात्कार प्रकरणाची एसआयटी चौकशी

uttar pradesh, rape, adg anand kumarलखनौ-उन्नाव बलात्कार प्रकरण आणि पीडितेच्या वडिलांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी आता विशेष तपास पथकाद्वारे करण्यात येणार आहे. येथे एका १८ वर्षीय महिलेवर बलात्कार झाला होता. या प्रकरणात भाजप आमदार कुलदीप सेंगर आणि त्यांचा भाऊ आरोपी आहेत.

या प्रकरणी एसआयटी प्रकरणाच्या मुळापर्यंत जाईल, असे एडीजी अनंद कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे. आज सकाळी, बलात्काराचा आरोप असलेल्या भाजप आमदाराचा भाऊ अतूल सिंह याला अटक करण्यात आली आहे. तसेच भाजप आमदार कुलदीप यांनी विरोधकांचे हे कटकारस्थान असल्याचे म्हणत त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावला आहे. सोमवारी पीडितेच्या वडिलांचा उन्नाव येथे कोठडीत मृत्यू झाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments