Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeदेशविंग कमांडर अभिनंदन यांच्या ‘५१ स्क्वाड्रन’चा विशेष सन्मान

विंग कमांडर अभिनंदन यांच्या ‘५१ स्क्वाड्रन’चा विशेष सन्मान

wing commander abhinandan
नवी दिल्ली : अभिनंदन वर्थमान यांनी पाकिस्तानच्या हवाई घुसखोरीचा प्रयत्न फोल ठरवल्याच्या कामगिरीबद्दल त्यांच्या स्क्वाड्रन ५१ चा वायुदलाकडून विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

मिग-२१ विमानातून एफ-१६ सारखे विमान जमीनदोस्त करणाऱ्या अभिनंदन यांच्या धाडसाने केलेल्या पराक्रमाचे संपुर्ण देशाकडून कौतुक केले जात होते. मात्र, आता त्याच कामगिरीचे वायुदलाच्या वतीने त्यांना विशेष सन्मानित केले जाणार आहे. हा विशेष सन्मान चीफ मार्शल राकेश कुमार सिंग भदौरीया हे अभिनंदन यांच्या स्क्वार्डनचा सन्मान करणार आहे.

कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन सतीश पवार हे ५१ क्वाड्रनचा हा सन्मान स्वीकारणार असून या व्यतिरिक्त बालाकोट एअरस्ट्राइक यशस्वीपणे राबवणाऱ्या ९ क्वाड्रनचा देखील सन्मान करण्यात येणार आहे. विंग कमांडर अभिनंदन यांना वीरचक्र देण्यात आले असून कंट्रोल रूममधली परिस्थिती भारताच्या हवाई दलाकडून स्क्वाड्रन लीडर मिंटी अग्रवाल यांनाही वीरचक्र देण्य़ात आले आहे. मात्र आता अभिनंदन यांच्या स्क्वाड्रन ५१ चा भारतीय वायूदलाकडून विशेष सन्मान होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments