Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeदेशसनी झाली जुळ्या मुलांची आई

सनी झाली जुळ्या मुलांची आई

sunney leoneyसनी लिओनी काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राच्या लातूर येथील अनाथाश्रमातून निशाला दत्तक घेतलं होतं. दत्तक घेतल्याच्या पहिल्या दिवसापासून निशासुद्धा एक स्टार किड झाली होती. निशाच्या आगमनाने सनीचं कुटुंब पूर्ण झालं असं वाटत होतं पण तसं नाहीये. सनीने एक फोटो सोशल मीडियावर शेअर करुन तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

सनीने नुकतेच सरोगसीद्वारे जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. सनीने इन्स्टाग्रामवर आपल्या संपूर्ण कुटुंबाचा एक फोटो शेअर करत ‘आता माझे कुटुंब पूर्ण झाले’ असे म्हटले. या फोटोमध्ये सनीच्या हातात एक बाळ आहे तर तिचा पती डॅनियलच्या हातात एक बाळ आहे. या दोघांच्या मध्ये छोटी निशा बसली आहे.

या फोटोद्वारे सनीने तिच्या मुलांची नावं ही सर्वांना सांगितली. सनीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘२१ जून २०१७ या दिवशी मला कळलं की अगदी थोड्या काळात मी तीन मुलांची आई होणार आहे. आम्ही मुलांचा विचार करायला सुरूवात केली आणि संसाराच्या एवढ्या वर्षांनंतर आता माझं कुटुंब अशर सिंग वेबर, नोहा सिंग वेबर आणि निशा कौर वेबरमुळे पूर्ण झालं आहे. काही आठवड्यांपूर्वी माझ्या मुलांचा जन्म झाला असला तरी गेल्या कित्येक वर्षांपासून ते आमच्याच हृदयात होते. देवाच्या कृपेने मला एक मोठं कुटुंब मिळालं आणि मला आणि डॅनियलला सुंदर अशी तीन मुलं आहेत.’

काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत सनी म्हणाली होती की, ती कामात कितीही व्यग्र असली तरी निशासाठी ती वेळ काढतेच. अनेकदा सनी निशाला घेऊनच सिनेमाच्या सेटवर जाते. सनी तिच्या दिवसाची सुरूवात निशाचा चेहरा पाहूनच करते. सनीची संपूर्ण सकाळ ही फक्त निशासाठीच असते. चित्रीकरणाला जाण्यापूर्वी सनी तिचा जास्तीत जास्त वेळ निशासोबत घालवते.

सनी लिओनी आणि तिचा नवरा डॅनिअल वेबरने निशाला जुलैमध्ये २०१७ मध्ये दत्तक घेतले होते. निशाला लातूरहून मुंबईत आणताचे अनेक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. निशासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना सनीने लिहिले होते की, निशाही तिच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण भाग आहे.

सनी म्हणाली होती की, निशाला आम्ही योग्य वेळी सर्व खरं सांगू की तिला दत्तक घेण्यात आले आहे. मुल झाल्यानंतर अनेक पालकांच्या आयुष्यात स्थैर्य आलेलं मी पाहिलं आहे. आमच्याबाबतीत हे थोडं कठीण होत आहे. आमच्यासाठी प्रत्येक दिवस एक नवं आन्हान असतं. पण पालक झाल्यापासून तुमच्यात अनेक सकारात्मक बदल आपोआप होत जातात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments