Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशखासदार सुरेश प्रभूंचा चौदा दिवस घरामध्ये मुक्काम!

खासदार सुरेश प्रभूंचा चौदा दिवस घरामध्ये मुक्काम!

Suresh Prabhu, coronavirus, coronaनवी दिल्ली : जगभरात कोरोना प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालला आहे. माजी केंद्रीय मंत्री, भाजप खासदार सुरेश प्रभू यांनी स्वत:ला १४ दिवसांसाठी घरामध्ये क्वारंटाइन केले आहे. खासदार प्रभू हे सौदी अरबमधून परतले आहेत. त्यांची तपासणी करण्यात आली मात्र, त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे.

दोन दिवसांपूर्वीच परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनीही स्वत:ला क्वारंटाइन केले होते. त्यापाठोपाठ आता खासदार सुरेश प्रभू यांनीही क्वारंटाइन केले आहेत. खासदार सुरेश प्रभू हे १० मार्च या दिवशी सौदी अरबमधील एका बैठकीला उपस्थित राहून भारतात परतले. मात्र आल्याबरोबर सुरेश प्रभू यांनी करोना विषाणूची तपासणी केली. त्यात त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला. मात्र, असे असले तरी प्रभू यांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वत:ला आपल्या घरात क्वारंटाइन करून घेतले. ते १४ दिवस कोणाच्याही संपर्कात येणार नाहीत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments