Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशतामिळनाडूत पेरियार यांच्या पुतळ्याची तोडफोड!

तामिळनाडूत पेरियार यांच्या पुतळ्याची तोडफोड!

periyar statueमहत्वाचे…
१. भाजपा कार्यालयावर फेकला पेट्रोल बॉम्ब
२. मंगळवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला.
३. भाजपा कार्यकर्त्यांचा त्रिपुरामध्ये उन्माद


चेन्नई: त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी उन्माद घातला. तामिळनाडूतील वेल्लूर येथे पेरियार यांच्या पुतळ्याची तोडफोड केली.याला प्रतिउत्तर म्हणून तामिळनाडूतील भाजपा कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकल्याचे प्रकरण समोर आले आहे. मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली. सीसीटीव्ही फुटेज समोर आले.

तामिळनाडूतील कोईमतूर येथील भाजपाच्या कार्यालयावर मंगळवारी रात्री उशिरा अज्ञात युवकांनी पेट्रोल बॉम्ब फेकला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ही घटना वेल्लूरमध्ये पेरियार आंदोलनाची सुरूवात करणाऱ्या इ.व्ही. रामास्वामी यांनी पेरियार यांचा पुतळ्याची तोडफोड केल्याप्रकरणी भाजपा आणि एका सीपीआय कार्यकर्त्याच्या अटकेनंतर घडली. पुतळ्याच्या चेहऱ्याची तोडफोड केल्यानंतर वेल्लूर जिल्ह्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली.

वेल्लूर जिल्ह्यात मंगळवारी रात्री समाजसुधारक आणि द्रविड आंदोलनाचे संस्थापक इ व्ही रामासामी पेरियार यांच्या प्रतिमेचे नुकसान करण्यात आले. दारूच्या नशेत असलेल्या दोघांनी हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना राजकीयदृष्टया अत्यंत महत्वाची आहे. कारण भाजपाच्या एका नेत्याने पुढचा नंबर हा एका नास्तिक नेत्याच्या पुतळ्याचा असल्याचे म्हटले होते. याप्रकरणी दोन व्यक्तींना आता अटक करण्यात आली आहे. मुथुरमन आणि फ्रान्सिस अशी त्यांची नावे आहेत. दोघांना अटक केली असून दारूच्या अंमलाखाली हे कृत्य झाल्याचे सांगण्यात येते. मुथुरमन हा भाजपाचा तर फ्रान्सिस हा सीपीआयचा कार्यकर्ता असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र त्रिपुरा निकालानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सर्वत्र उन्माद सुरु केला आहे.

तत्पूर्वी भाजपाचे एक नेते एच राजा यांनी तामिळ भाषेत फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, लेनिन कोण आहे. लेनिन आणि भारतामध्ये काय संबंध आहेत. भारत आणि कम्युनिस्टांमध्ये काय संबंध आहे. आज त्रिपुरात पुतळा हटवण्यात आला. उद्या तामिळनाडूमधल इ व्ही रामास्वामी यांचा पुतळा असू शकतो. नंतर या नेत्याने आपली पोस्ट डिलिट केली होती.

इ व्ही रामास्वामी उर्फ पेरियार (१८७९-१९७३) यांनी प्रसिद्ध पेरियार आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन नास्तिकतेच्या प्रसारासाठी ओळखले जाते. त्यानंतर द्रविड कडगम नावाने राजकीय पक्षही काढला होता. त्याच्या विविध शाखा आणि डीएमकेसारख्या द्रविडियन पक्षाच्या सदस्यांनी नास्तिकतेचा प्रसार केला होता. तत्पूर्वी,  त्रिपुरात लेनिनचा पुतळा पाडण्यात आला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments