‘थँक्यू गुजरात’, महापालिका निवडणूक निकालानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

- Advertisement -
thank-you-gujarat-pm-modis-reaction-on-gujarat-municipal-election-win-
thank-you-gujarat-pm-modis-reaction-on-gujarat-municipal-election-win-

नवी दिल्ली: गुजरातमध्ये महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होत असून तिथल्या मतदारांनी पुन्हा एकदा भाजपावर विश्वास दाखवला आहे. गुजरात महापालिका निवडणूक निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा खास टि्वट करुन मतदारांचे आभार मानले आहेत.

“गुजरात महापालिका निवडणूक निकालातून लोकांचा सुशासन आणि विकासाच्या राजकारणावर विश्वास असल्याचे दिसून येते. भाजपावर पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याबद्दल राज्यातल्या जनतेचा आभारी आहे. गुजरातची सेवा करणं ही नेहमीच सन्मानाची बाब आहे” असं मोदींनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

“गुजरात भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने जे कष्ट घेतले, त्या बद्दल मी त्यांचे कौतुक करतो. कार्यकर्ते लोकांपर्यंत पोहोचले व पक्षाचे व्हिजन त्यांनी लोकांना समजावून सांगितले. गुजरात सरकारची जी लोकाभिमुख धोरणे आहे, त्याचा संपूर्ण राज्यावर सकारात्मक परिणाम दिसून आला” असे मोदींनी म्हटले आहे.

- Advertisement -

मागच्या दोन दशकांपासून गुजरातमध्ये भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे आज संपूर्ण गुजरातमध्ये मिळालेला विजय खास आहे. समाजातील सर्व घटकांकडून खासकरुन गुजरातमधल्या युवावर्गाकडून भाजपाला पाठिंबा मिळत असल्याबद्दल मोदींनी आनंद व्यक्त केला.

- Advertisement -