Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeदेशभाजपने आमच्या जाहीरनाम्याची नक्कल केली: राहुल गांधी

भाजपने आमच्या जाहीरनाम्याची नक्कल केली: राहुल गांधी

बंगळुरू: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर पुन्हा एकदा हल्ला चढवला. आम्ही कर्नाटकात फिरलो. लोकांशी चर्चा केली आणि नंतरच आमचा निवडणूक जाहीरनामा तयार केला. भाजपनं मात्र आमच्या अनेक गोष्टी ढापत आमच्या जाहीरनाम्याची नक्कल केली,’ असा दावा राहुल गांधी यांनी केला.

बंगळुरू येथे पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांनी भाजपवर शरसंधान साधलं. ‘या निवडणूक प्रचाराच्या काळात भाजपनं शिष्टाचार पाळला नाही. त्यांनी व्यक्तिगत टीका करण्यावर अधिक भर दिला. आम्ही मात्र मुद्द्यांवर निवडणूक लढत होतो,’ असं राहुल यांनी सांगितलं. भाजपच्या दोन-चार नेत्यांनी केवळ अर्ध्या तासांत त्यांचा जाहीरनामा तयार केला. आमच्या जाहीरनाम्याचीच नक्कल केली. त्यामुळे कर्नाटकात आमचा विजय निश्चितच आहे, असंही ते म्हणाले. ‘देशात दलितांच्या हत्या होत आहेत. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मौन आहे. ते काहीच बोलत नाहीत. रोहित वेमुलाप्रकरण आणि उन्नावच्या घटनेवरही मोदी काहीच बोलले नाहीत. आम्ही दलितांचे प्रश्न उचलतो आणि उचलत राहणार,’ असं त्यांनी स्पष्ट केलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments