कंडोम वापरणाऱ्या महिलांच्या संख्येत सहापट वाढ

- Advertisement -

नवी दिल्ली: ‘सेफ सेक्सला प्राधान्य देणाऱ्या अविवाहित आणि सेक्शुअली अॅक्टिव्ह महिलांचे प्रमाण भारतात वाढत असल्याचे नुकतेच सर्व्हेक्षणात सिद्ध झाले आहे. आरोग्य मंत्रालयाकडून घेण्यात आलेल्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसार कंडोम वापरणाऱ्या अविवाहित महिलांची संख्या गेल्या दहा वर्षांत सहापटीनं वाढली आहे.

२०१५-१६ दरम्यान करण्यात आलेल्या या सर्वेक्षणानुसार, १५ ते ४९ या वयोगटातील सेक्शुअली अॅक्टिव्ह महिलांमधील कंडोम वापरण्याचे प्रमाण २ टक्क्यांहून १२ टक्क्यांवर गेले आहे. तर, २० ते २४ वर्षांच्या मुलींमध्ये कंडोम वापरण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. एकंदरीत देशातील मुलींमध्ये आणि महिलांचा कल ‘सेफ सेक्स’कडे झुकताना दिसतो आहे.
या सर्वेक्षणातून समोर आलेली दुसरी चांगली बाब म्हणजे, आपल्या देशातील ९९ टक्के विवाहित जोडप्यांना किमान एका गर्भनिरोधक पर्यायाबद्दल माहिती असल्याचेही स्पष्ट झाले आहे. कंडोमचा वापर वाढत असताना २५ ते ४९ वयोगटातील विवाहित महिला मात्र, कुटुंब नियोजनासाठी नसबंदीला महत्त्व देतात, तर, देशातील ६१ टक्के पुरुषांचा कंडोमवर विश्वास असल्याचेही या सर्व्हेतून स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -
- Advertisement -