Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेश१ एप्रिलपासून ‘हे’ नियम बदलणार!

१ एप्रिलपासून ‘हे’ नियम बदलणार!

1 April, april fool . fool day, aadhar card, pan cardनवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्ष (२०२०-२१) १ एप्रिलपासून सुरू होत आहे. त्यामुळे नवीन आर्थिक वर्षात काही नियम बदलणार आहेत. GST, पॅनकार्ड आयकरसंबधी नियम बदलणार असल्यामुळे दैंनदिन आयुष्यावर याचा परिणाम होणार आहे. १ एप्रिलपासून कोणत्या नियमांमध्ये बदल होणार आहे. त्यामुळे जाणून घेऊ या.

पॅन-आधार कार्ड…

पॅन कार्ड आधार सोबत जोडण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२० आहे. त्यामुळे आयकर विभागाकडून नागरिकांना इशारा देण्यात आला आहे की, ३१ मार्चपर्यंत जर तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड नाही केलं, तर पॅन कार्ड संबंधित सर्व काम थांबवण्यात येतील आणि पॅन कार्डदेखील रद्द करण्यात येईल. कारण याआधीही आधार-पॅन लिंक करण्याची तारीख अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली आहे.

आता आधार-पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च आहे. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार ३१ मार्चनंतर सुद्धा तुमचं पॅन कार्ड आधारसोबत जोडता येईल, मात्र जोपर्यंत तुम्ही लिंकिगची प्रक्रिया पूर्ण करणार नाही तोपर्यंत तुमचं पॅनकार्ड इन-ऑपरेटिव्ह अर्थात निष्क्रिय राहील.

नवीन करप्रणाली…

केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्र सरकारने पर्यायी दर आणि टॅक्स स्लॅबसह नवीन आयकर प्रणाली लागू केली आहे. १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.  नवीन कर प्रणालीत कोणत्याही सूट आणि कपातीचा कोणताही फायदा होणार नाही. नवीन कर प्रणाली वैकल्पिक आहे म्हणजेच जर करदाता इच्छुक असेल तर तो जुन्या कर स्लॅबनुसार प्राप्तिकर भरू शकतो. त्याचबरोबर नव्या करप्रणालीअंतर्गत वार्षिक पाच लाख रुपये उत्पन्न असणाऱ्याना कोणताही कर भरावा लागणार नाही.

५ ते ७.५ लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांसाठी कर दर १०%, ७.५ ते १० लाख रुपयांच्या उत्पन्नावर १५%, १० लाख ते १२.५ लाखांवर २०%, १२.५ लाख ते १५ लाख रुपयांच्या उत्पन्नावर २५% आणि १५ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर ३०% दराने कर आकारला जाईल.

नवीन जीएसटी रिटर्न…

जीएसटी काउंसिलच्या ३१ व्या बैठकीमध्ये टॅक्सपेअर्ससाठी नवीन जीएसटी रिटर्न सिस्टिम घेऊन येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी होईल. यामुळे जीएसटी रिटर्न भरणं अधिक सोपं होणार आहे. नवीन व्यवस्थेअंतर्गत २  नवीन फॉर्म असणार आहेत. GST FORM ANX-1 आणि GST FORM ANX-2.

औषधांशी संबंधित नियम बदलतील…

सरकारने सर्व वैद्यकीय उपकरणं औषधं म्हणून घोषित केली आहेत. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी एक अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार मानव आणि प्राण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणांनाही ड्रग्ज म्हणजेच औषधं संबोधण्यात येतील. त्यानंतर ड्रग्स अँड कॉस्मेटिसिस कायदा, १९४० च्या (२३ of १९४०)  कलम ३  अंतर्गत या उपकरणांना ड्रग्स म्हणून वर्गीकृत केले जाईल.

परदेशी टूर पॅकेजसाठी TCS…

१ एप्रिल २०२० पासून विदेशी टूर पॅकेज खरेदी करणे आणि परदेशामध्ये कोणताही फंड खर्च करणे महाग होणार आहे.  जर कोणी परदेशी टूर पॅकेज विकत घेत असेल किंवा परकीय चलन एक्सचेंज करत असेल तर त्या व्यक्तीला ७ लाखांहून अधिक रकमेवर टीसीएस अर्थात टॅक्स कलेक्टेड अट सोअर्स द्यावा लागेल.

वाहन नियम…

१ एप्रिलपासून देशात केवळ BS-6 मानक वाहनेच विक्री केली जातील. सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर २०१८ मध्ये आदेश दिला होता की BS-४ मानक असणारी नवीन वाहनं ३१ मार्च २०२० नंतर विकली जाणार नाहीत. BS-4 वाहने विकण्यासाठी ऑटोमोबाईल कंपन्या अनेक ऑफर घेऊन आल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments