Placeholder canvas
Friday, April 19, 2024
HomeदेशVideo: महापंचायतीत गर्दीमुळे तुटला मंच; राकेश टिकैत यांच्यासह इतर नेते कोसळले

Video: महापंचायतीत गर्दीमुळे तुटला मंच; राकेश टिकैत यांच्यासह इतर नेते कोसळले

जिंद(हरयाणा): हरयाणातील जिंद येथे आज शेतकरी महापंचायतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी आसपासच्या गावातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी गोळा झाले होते. यावेळी नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याने मंच अचानक तुटला आणि त्यावर उपस्थित असलेल्या राकेश टिकैत यांच्यासह इतर शेतकरी नेते खाली कोसळले. यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला मात्र, काही वेळातच पुन्हा महापंचायतीला सुरुवात झाली.

भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत हे मंचावर बोलण्यासाठी उभे राहिले तेवढ्यात अधिकच्या वजनामुळे ते त्यावर उपस्थित लोकांसह कोसळल. त्यानंतर एकच गोंधळ झाल्याने समोर बसलेले शेतकरी देखील उठून उभे राहिले. मात्र, काही वेळातच व्यासपीठ व्यवस्थित केल्यानंतर ते पुन्हा व्यवसपीठावर आले आणि भाग्यवान लोकांचेच व्यासपीठ तुटतात, असं म्हणतं भाषणाला दमदार सुरुवात केली.

 जिंद महापंचायतीनं हात उंचावून केले पाच ठराव मंजूर

जिंद महापंचायतीत पाच प्रस्ताव मंजूर करण्यात आले. हे सर्व प्रस्ताव लोकांनी हात उंचावून मंजूर केले. यामध्ये सर्वात प्रमुख म्हणजे तीन्ही कृषी कायदे रद्द करणे, दुसरा एमएसपीबाबत कायदा करणे, तिसरा स्वामीनाथन आयोग लागू करणे, चौथा दिल्लीमध्ये अटक केलेल्या शेतकऱ्यांना आणि ट्रॅक्टर्सना सोडणे, आणि शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावं, या ठरावांचा यात समावेश होता.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आजचा 70 वा दिवस आहे. दिल्लीच्या सिंधू, टिकरी आणि गाझीपूर बॉर्डरवर आंदोलक शेतकरी अजूनही तळ ठोकून आहेत. दरम्यान शेतकरी नेते राकेश टिकैत आज हरियाणातील जिंद इथं महापंचायतीला संबोधित करण्यासाठी पोहोचले आहेत.

टिकैत यांचं भाषण ऐकण्यासाठी शेतकरी आणि महिलांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी टिकैत यांनी भाषणाला सुरुवात करण्यापूर्वीच ते उभे असलेलं व्यासपीठ कोसळलं. त्यावेळी एकच गोंधळ उडाल्याची चित्र पहायला मिळालं. पण टिकैत यांनी परिस्थितीचं भान ओळखून व्यासपीठ तर भाग्यवान लोकांचे कोसळतात अशी कोटी केली. त्यामुळे वातावरण हलकं होण्यास मदत झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments