Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशराज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार; आठवलेंचा दावा

राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार; आठवलेंचा दावा

Shiv Sena should change role - Ramdas Athawaleनवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. यामुळे हा राजकीय भूकंप काय असणार अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु झाली आहे.

राज्यात शिवसेना आणि भाजपमध्ये काडीमोड झाल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेससोबत घरोबा केला. मात्र, महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार सत्तास्थापण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना सोबत घेऊन सत्तास्थापन केली होती. मात्र, हे सरकार ७९ तासातं कोसळलं आणि राज्यात राजकीय भूकंप झालं. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस,राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं.

भाजपशी नाराज नेते पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांनी १२ डिसेंबर रोजी भाजपवर तोफ डागली. त्याचवेळी खडसेंनी मी भाजपात राहणार की नाही याचा भरवसा नाही असे स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे खडसे हे भाजपातून बाहेर पडणार हे जवळपास निश्चित आहे.  पंकजा मुंडे या जरी भाजपसोडणार नाही म्हणाल्या तरी सुध्दा त्या पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे कंटाळल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपच्या नेत्यांबाबत विविध दावे केले आहे. त्यामुळे राजकीय भूकंप होणार हे जवळपास निश्चित आहे. परंतु रामदास आठवले यांनी डिसेंबरमध्ये राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा केल्यामुळे पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments